Bigg Boss 17 Finale: ‘बिग बॉस १७’चा ग्रँड फिनाले काल, २८ जानेवारीला पार पडला. संध्याकाळी ६ वाजता सुरू झालेला हा फिनाले रात्री १२.३०च्या सुमारास संपला. तब्बल सहा तास हा ग्रँड फिनाले सोहळा रंगला होता. अजय देवगण, आर. माधवन, माधुरी दीक्षित, सुनील शेट्टी या कलाकारांनी या फिनालेला हजेरी लावली होती. रात्री १२.३०च्या सुमारास सलमान खानने ‘बिग बॉस १७’चा विजेता म्हणून मुनव्वर फारुकीचं नाव जाहीर केलं. तेव्हापासून मुनव्वरवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण दुसऱ्याबाजूला अंकिता लोखंडेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अंकिता ही टॉप-३पर्यंतही पोहोचू शकली नाही, याचं चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे. ग्रँड फिनालेनंतरचे अंकिताचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये ती नाराज पाहायला मिळत आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या पेजवर अंकिता लोखंडेचा फिनालेनंतरचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अंकिता आपल्या आईबरोबर दिसत आहेत. ती मीडियाशी काही न बोलता नाराज होऊन जाताना पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.

हेही वाचा – Video: फिल्मफेअरमध्ये रणबीर कपूर व तृप्ती डिमरीचा रोमँटिक डान्स, पाहा व्हिडीओ

अंकिताच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी तिला पाठिंबा दर्शवला आहे तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “मुनव्वर जिंकण्यापेक्षा ही हरल्यामुळे जो काही आनंद होतोय.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “अतिआत्मविश्वासचा परिणाम पाहिलात?” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “घरीही अपमान बाहेरही अपमान.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “सासूबाईचा आज उपवास नव्हता का?”

हेही वाचा – Video: “हे खूप चुकीचं आहे…”, Bigg Boss 17च्या निकालावर अंकिता लोखंडेची जाऊबाई नाराज, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अंकिता लोखंडे पती विक्की जैनबरोबर ‘बिग बॉस १७’मध्ये सहभागी झाली होती. दोघं या पर्वाच्या शेवटच्या आठवड्यांपर्यंत पोहोचले. पण दोघांपैकी कोणी विजेता होऊ शकलं नाही.