Ankita Walawalkar Aka Kokan Hearted Girl : अंकिता वालावलकर ‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले संपल्यावर जवळपास १५ दिवसांनी तिच्या गावी मालवणात परतली आहे. मुंबईतील सगळी कामं आटपून ही ‘कोकण हार्टेड गर्ल’ आपल्या आई-बाबांना भेटण्यासाठी गावी पोहोचली आहे. यावेळी अनेक महिन्यांनी घरी आलेल्या मुलीचं औक्षण करून अंकिताच्या आईने स्वागत केलं. ‘बिग बॉस मराठी’चे अन्य सदस्य आपआपल्या गावी गेले तेव्हा त्यांची भव्य रॅली काढण्यात आली होती. मात्र, अंकिताचं स्वागत तिच्या घरी अगदी साध्या पण, सुंदर अशा पद्धतीने करण्यात आलं. याबाबत आता एका युजरने तिच्या पोस्टवर नकारात्मक कमेंट केली आहे.

अंकिताने काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ शेअर करत “मी मुंबईतली सर्व कामं करून आई-बाबांकडे जाणार आहे. मग, निवांत कोकणात राहीन आणि रॅली वगैरे मला आवडत नाही. त्यामुळे मी त्या गोष्टींसाठी नकार दिलाय” असं सांगितलं होतं. एवढं स्पष्टीकरण देऊनही अंकिताच्या नुकत्याच एका पोस्टवर एका युजरने खोचक कमेंट केली. यावर अंकिताने देखील संबंधित युजरने चांगलंच सुनावलं आहे.

हेही वाचा : Zee Marathi Awards 2024 : सर्वोत्कृष्ट सासू अन् सून ठरली ‘ही’ एकच अभिनेत्री! तर, सर्वोत्कृष्ट मुलगा ठरला…

अंकिता वालावलकरचं स्पष्ट उत्तर

युजरने लिहिलंय, “कोकणात गावी गेली ही मुलगी…कोणीही या मुलीचं Welcome केलं नाही. यावरून कळतं की किती कोकण हार्टेड मुलगी आहे ही…”

यावर अंकिता ( ankita walawalkar ) उत्तर देत म्हणाली, “मला रॅली आवडत नाही, पोस्टरबाजी सुद्धा नाही. मी स्वत: मुद्दाम… थोडीशी उशिरा गावी गेले या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी… जेवढे मला फोन आले त्या सगळ्यांना मी आधीच मला काहीही मोठे कार्यक्रम नकोत असं कळवलं होतं. त्यामुळे उगीच नकारात्मक काहीतरी बोलण्यापेक्षा स्वत:वर लक्ष द्या.”

Ankita Walawalkar
अंकिता वालावलकरचं युजरला स्पष्ट उत्तर ( Ankita Walawalkar )

हेही वाचा : ‘झी मराठी’वर सुरू होणार ‘लक्ष्मी निवास’! हर्षदा खानविलकर अन् तुषार दळवी प्रमुख भूमिकेत, पाहा पहिला प्रोमो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अंकिताने जरी रॅली वगैरे काढली नसली, तरीही तिच्यावर प्रेम करणारा तमाम चाहतावर्ग तिला भेटून, विचारपूस करून, कोकण हार्टेड गर्लला भेटवस्तू देत असल्याचं नुकत्याच तिच्या काही इन्स्टाग्राम स्टोरींमध्ये पाहायला मिळालं. याशिवाय अंकिता वालावलकर ( ankita walawalkar ) वैयक्तिक आयुष्यात लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय संगीत दिग्दर्शक कुणाल भगतबरोबर अंकिता लग्नगाठ बांधणार आहे.