‘इंडियन आयडॉल’ या कार्यक्रमात देशातील उत्तम गायक आपल्या गाण्यातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. या कार्यक्रमात वेगवेगळ्या थीम्स ठेवल्या जातात. नुकतंच नव्व्दच्या दशकातील सुपरहिट गाणी अशी थीमच्या निमित्ताने ‘आशिकी’ चित्रपटाशी निगडित कलाकार मंडळींना सेटवर बोलवण्यात आले होते. चित्रपटातले मुख्य कलाकार राहुल रॉय, अनु अगरवाल उपस्थित होते.

या कार्यक्रमात तिच्याबरोबर भेदभाव झाला असं अनुने स्पष्ट केलं. या कार्यक्रमात तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तसेच समाजसेवेबद्दल भाष्य केलं, पण या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप अनु अगरवालने केला होता. शिवाय एपिसोड जेव्हा प्रसारित झाला तेव्हा तिला फ्रेमबाहेर ठेवल्याचंही अनुने स्पष्ट केलं होतं. या प्रकरणाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली. याबद्दल अनुनेही खेद व्यक्त केला होता.

आणखी वाचा : पुरस्कार स्वीकारताना रणवीर सिंगला अश्रू अनावर; वडिलांबरोबरची आठवण शेअर करत म्हणाला, “१२ वर्षांपूर्वी…”

नुकतंच अनू अगरवालने याबाबत एक वक्तव्य केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना अनुने याबाबत वक्तव्य केलं आहे. ती म्हणाली, “मी खरंतर कोणताही कार्यक्रम पाहत नाही, कोणत्याही कार्यक्रमाला जात नाही, मी केवळ तिथे आमच्या ‘आशिकी’ चित्रपटाखातर गेले.” शिवाय याच मुलाखतीमध्ये पुन्हा इंडियन आयडॉलमध्ये जाल का या प्रश्नावर अनुने स्पष्टीकरणही दिलं. ती म्हणाली, “मी त्यांना विचारेन की मला पुन्हा कट करणार आहात का? पण त्यांच्याबद्दल माझी कोणतीच तक्रार नाही, ते मला पुन्हा बोलवतील का हेदेखील माहीत नाही. पण पुढच्या वेळी मी जरा या गोष्टीची काळजी घेईन.”

View this post on Instagram

A post shared by Anu Aggarwal (@anusualanu)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनु मूळची दिल्लीची असून तिने आपल्या सुरवात मॉडेलिंग क्षेत्रापासून केली. ‘इसी बहाने’ या मालिकेत तिने काम केले. तिच्या अपघातानंतर तिने योगा शिकला आहेआणि सध्या ती सामाजिक कार्यात सहभागी होत असते.