‘शार्क टॅंक इंडिया’चा पहिलं पर्व खूप गाजलं. त्यानंतर आता नुकतंच या कार्यक्रमाचं दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. पण पर्वात भारत पेचा माजी सह-संस्थापक आणि उद्योजक अश्नीर ग्रोव्हर शार्क म्हणून सहभागी झालेला नाही. पण तरीही या कार्यक्रमाबद्दल तो वक्तव्य करताना दिसत आहे. आता त्याच्या वक्तव्यांवर शार्क अनुपम मित्तल याने भाष्य केलं आहे.

अश्नीर ग्रोव्हर नुकतीच एक मुलाखत दिली होती. त्यात तो या कार्यक्रमातील इतर शार्क्सना अनफॉलो करण्याच्या त्याच्या निर्णयाबाबत बोलला. त्याचप्रमाणे त्याने “१० हजार कोटी रुपयांची शोची फ्रेंचायझी तयार करण्यात एक भाग होतो. मी ५०० कोटी रुपयांची फ्रँचायझी सोनी टीव्हीला बनवून दिली,” असंही विधान केलं होतं. आता त्यावर अनुपम मित्तल याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा : Video: रितेश देशमुखच्या प्रश्नाचं करीना कपूरने दिलं मराठीत उत्तर, म्हणाली…; व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा : “सर्व शार्क्सना अनफॉलो केलंय” अश्नीर ग्रोव्हरचा ‘शार्क टँक’बद्दल खुलासा म्हणाला, “त्यांना १० हजार कोटींचा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनुपम मित्तलने नुकतीच ‘ई टाइम्स’ला एक मुलाखत दिली. त्यात तो म्हणाला, “हा शो माझ्या किंवा दुसऱ्या कुठल्याही शार्कबद्दल नसून तो आपल्या देशाबद्दल आहे. इथे सर्वजण आपलं टॅलेंट दाखवायला येतात. या शोला कोणीही मोठं केलेलं नाही किंवा समाजात या शोची असलेली प्रतिमा कोणीही बिघडवू शकत नाही. आमच्यापैकी कोणीही कोणालाही मिस करत नाही किंवा यापुढेही करणार नाही. आम्ही सगळे एकत्र येऊन हा शोक कसा चालवतो यात खरी गंमत आहे.” आता अनुपमच्या या बोलण्यावर अश्नीर काय प्रतिक्रिया देतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.