Arbaz Patel & Nikki Tamboli : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमुळे अरबाज पटेलला घराघरांत लोकप्रियता मिळाली. या शोदरम्यान त्याची अन् निक्की तांबोळीची पहिली भेट झाली होती. शोमध्ये एन्ट्री घेतल्यावर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली, पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. ‘बिग बॉस’ संपल्यावर अरबाज व निक्कीला त्यांच्या नात्याबद्दल अनेक प्रश्न विचारले जात होते मात्र, या दोघांनी रिलेशनशिपचा कधीही जाहीरपणे स्वीकार केला नव्हता. यादरम्यान त्यांचे कपल फोटोज, रोमँटिक फोटोशूटची कायम चर्चा होत असायची.
मात्र, अलीकडेच अरबाज ‘राइज अँड फॉल’ या एका नव्या शोमध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याने सहस्पर्धकाशी बोलताना निक्कीचा उल्लेख स्पष्टपणे गर्लफ्रेंड असा केला. याशिवाय फॅमिली वीकमध्येही निक्की त्याला भेटायला आली होती.
अरबाज ‘राइज अँड फॉल’ या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेला असताना निक्कीने त्याला खूप पाठिंबा दिला. धनश्री-अरबाजच्या मैत्रीवरून निक्कीला ट्रोल केलं गेलं. तरीही, निक्कीने अरबाजची साथ सोडली नाही. फॅमिली वीकमध्ये एन्ट्री घेतल्यावर तिने अरबाजची चांगलीच कानउघडणी केली होती.
अरबाजला मोठ्या प्रमाणात व्होटिंग व्हावं यासाठीही निक्कीने बरेच प्रयत्न केले. या शोमध्ये अरबाज सेकंड रनर अप ठरला. आता ४२ दिवसांनी शो संपल्यावर अखेर तो घरी परतला आहे.
शो संपल्यावर अरबाजने निक्कीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. अरबाज लिहितो, “My Love! माझ्यावर कायम अशीच प्रेम करत राहा. कारण, तुझी ही साथ माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. लव्ह यू बेबी…मला माहितीये काही लोकांनी तुला आणि मला वेगळं करण्याचे अनेक प्रयत्न केले पण, तरीही तू माझी साथ कधीच सोडली नाहीस. कायम मला पाठिंबा दिलास. या सगळ्यासाठी तुझे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. जेव्हा तुला माझ्या मिठीत घेतो तेव्हा माझ्या मनात विश्वास निर्माण होतो की, तू माझ्याबरोबर असशील तर मी आयुष्यात काहीही करू शकेन असं मला वाटतं.”
“तू नसतीस तर कदाचित हा विश्वास माझ्यात कधीच निर्माण झाला नसता. सॉरी निक्की…ही पोस्ट खूप लेट लिहितोय कारण, मी शो संपवून इतक्या दिवसांनी घरी परतल्यावर तुझ्याबरोबर वेळ घालवण्यात बिझी होतो.” असं अरबाजने म्हटलं आहे.
दरम्यान, अरबाजची ही पोस्ट रिशेअर करत निक्कीने त्यावर “४२ दिवसांनी तुला घरी आलेलं पाहिल्यावर माझंही मन भरून आलं. खूप प्रेम..!” असं कॅप्शन दिलं आहे. तर, ‘राइज अँड फॉल’च्या पहिल्या सीझनचा विजेता अभिनेता अर्जुन बिजलानी ठरला आहे.
