बिग बॉसला सर्वाधिक वादग्रस्त शो म्हटलं जातं. अनेकदा हा शो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कधी या शोमध्ये अनेक कलाकारांनी वादग्रस्त खुलासे केले आहेत. तर कधी विजेतेपदावरून या शोबद्दल वाद झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या १६ सीझनमध्ये एमसी स्टॅनच्या विजेतेपदावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. पण याआधी १३ व्या सीझननंतर अशा प्रकारचे वाद झाले होते. त्यावेळी अभिनेता सिद्धार्थ शुक्ला विजेता ठरला होता आणि अभिनेता आसिम रियाजला रनरअप ठरवण्यात आलं होतं. आता ३ वर्षांनंतर आसिम रियाजने यावर भाष्य करताना सिद्धार्थ शुक्लाचं विजेतेपद ही फसवणूक होती असं वक्तव्य केलं आहे.

नुकतंच सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत आसिम रियाजने त्याच्या आयुष्यातील संघर्षावर भाष्य केलं. याच मुलाखतीत त्याने बिग बॉसबद्दलही काही खुलासे केले आहेत. त्याने सांगितलं की त्याला सुरुवातीला बिग बॉसमधून रिजेक्ट करण्यात आलं होतं. पण जेव्हा त्याने घरी जाण्यासाठी बॅग पॅक केली तेव्हा त्याला पुन्हा बिग बॉसच्या घरात बोलवण्यात आलं.

आणखी वाचा-“ती माझी सर्वात मोठी चूक…”, पान मसाल्याच्या जाहिरातीबद्दल स्पष्टच बोलला अक्षय कुमार

बिग बॉस १३ मध्ये उपविजेता ठरलेला आसिम रियाज म्हणाला, “माझ्यावेळीही त्यांनी काय केलं? मी जिंकावं असं त्यांना वाटत नव्हतं. आजही आपण वोटिंग लाइन ओपन करू १५ मिनिटांसाठी. ज्याला जिंकवायचं आहे जिंकवावं जनतेने. पण त्यांनी आम्हाला यावर विश्वास ठेवायला लावला की त्यांनी जे काही केलं ते योग्य आहे. पण खरं तर त्यांनी माझी हार आधीच ठरवलेली होती. फक्त हे स्पष्टपणे सांगितलं नाही. ती निव्वळ फसवणूक होती.”

बिग बॉस १३ च्या फिनालेनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ क्लिप शेअर केली होती आणि त्यातून आसिम रियाजवर टीका करण्यात आली होती. अनेकांच्या मते बराच काळ उलटून गेल्यानंतर आसिम अद्याप त्या विजेतेपदाच्या मुद्द्याला सोडून पुढे जाऊ शकलेला नाही. तसेच सिद्धार्थ शुक्लाच बिग बॉसचा सर्वात पात्र विजेता असल्याचंही अनेकांनी म्हटलं होतं.

आणखी वाचा- “त्यांनी मला त्यासाठीच बोलवलं होतं…” राज ठाकरे-शिव ठाकरेच्या भेटीत नेमकं काय घडलं? शिवने दिले सविस्तर उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आसिम रियाज बिग बॉस १३ मध्ये असताना त्याला राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरूनही पाठिंबा मिळाला होता. अगदी जॉन सीनानेही त्याला समर्थन दिलं होतं. पण तो विजेता होऊ शकला नव्हता. आसिमच्या कामाबद्दल बोलायचं तर त्याने बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर बऱ्या म्युझिक व्हिडीओमध्ये काम केलं होतं. आगामी काळात तो कंगना रणौतचा रिअलिटी शो ‘लॉकअप २’मध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे.