छोट्या पडद्यावरील अत्यंत नावाजलेला गाण्याचा रिॲलिटी शो म्हणजे ‘इंडियन आयडॉल.’ हा कार्यक्रम नेहमीच काही ना काही कारणाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतो. आता या कार्यक्रमाचं तेरावं पर्व सुरू आहे. या कार्यक्रमाच्या परीक्षकाच्या भूमिकेत नेहा कक्कर, विशाल दादलानी आणि हिमेश रेशमिया दिसत आहेत. नुकतीच या कार्यक्रमात ‘ॲक्शन हिरो’ या चित्रपटाच्या स्टारकस्टने हजेरी लावली. यावेळी अभिनेता आयुष्मान खुरानाही या मंचावर आला आणि त्याने त्याच्या इंडियन आयडॉलच्या ऑडिशनदरम्यानची एक आठवण सर्वांशी शेअर केली.

आयुष्मान खुरानाला अभिनय क्षेत्रातली कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसतानाही त्याने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आज तो एक आघाडीचा अभिनेता आणि गायक म्हणून ओळखला जातो. पण काही वर्षांपूर्वी तोही ‘इंडियन आयडॉल’ या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आला होता. पण या कार्यक्रमासाठी त्याची निवड झाली नाही.

आणखी वाचा : ‘हड्डी’ चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार ‘ही’ मराठी अभिनेत्री

त्या दिवसाची आठवण सांगताना आयुष्मान म्हणाला, “इंडियन आयडॉलच्या ऑडिशनमधून एकाच दिवशी नकार मिळालेल्या ५० स्पर्धकांमध्ये मी आणि नेहाही होतो. नेहाला आणि मला एकाच दिवशी ‘इंडियन आयडॉल’च्या ऑडिशन मधून नकार मिळाला होता. एकाच दिवशी आम्हाला सांगितले गेले की, तुम्ही या स्पर्धेतून बाहेर झाला आहात. तेव्हा मुंबईहून दिल्लीला जाताना आम्ही सगळेजण रडत होतो. पण आज नेहा या शोची परीक्षक आहे आणि मी इथे आलो आहे. माझ्यासाठी ही खूप भाग्याची गोष्ट आहे.” आयुष्मानच हे बोलणं ऐकून नेहाला हसू अनावर झाले. तर बाकी सगळेच जण आश्चर्यचकित झाले.

हेही वाचा : आयुष्मान खुरानाचा ‘डॉक्टर जी’ थिएटरनंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर नशीब आजमावण्यासाठी सज्ज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आयुष्मान खुराना काही दिवसांपूर्वी ‘डॉक्टर जी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर आता तो ॲक्शन हिरो या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट २ डिसेंबरला रिलीज होणार आहे.