टीव्ही क्षेत्रातील लोकप्रिय कॉमेडियन म्हणून भारती सिंहने २०१७ मध्ये हर्ष लिंबाचियाशी लग्नगाठ बांधली. तर गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात भारती सिंहने बाळाला जन्म दिला. तिचा मुलगा लक्ष्य हा आता लोकप्रिय स्टारकेंपैकी एक आहे. अवघ्या १० महिन्याचा असलेला लक्ष्य त्याच्या निरागसपणामुळे नेहमी सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो. पण आता त्याने केलेल्या एका कृतीमुळे सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत.

भारती सिंह अनेकदा लक्ष्यचे व्हिडीओ पोस्ट करत असते. कधी तो गाण्याचा आनंद घेताना दिसतो, तर कधी टाळ्या वाजवताना दिसतो. तर आता त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात भारतीने ‘जय श्रीकृष्ण’ म्हटल्यावर लक्ष्यने केलेली कृती सर्वांनाच आवडली आहे.

आणखी वाचा : “लोक माझ्या मुलाला…”; लेकाचे नाव चुकीचे उच्चारणाऱ्यांवर वैतागली भारती सिंग

भारती नुकतीच तिचा लेक लक्ष्यबरोबर मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. त्यावेळी फोटोग्राफर्सनी तिला घेरलं. भारतीबरोबर तिचा मुलगा लक्ष्यही असल्याने नेहमीप्रमाणे फोटोग्राफर्सनी त्याच्याबरोबर मस्ती करायला सुरुवात केली. तर एकाने लक्ष्यला आपल्या कडेवर घेतलं. लक्ष्यही त्या फोटोग्राफरच्या कडेवर बसून फोटोंसाठी छान पोज देत होता. इतक्यात भारती त्याला म्हणाली, “जय श्री कृष्ण करून दाखव.” भारती जय श्री कृष्ण म्हणताच लक्ष्य टाळ्या वाजवायला लागला. त्याने केलेली ही कृती पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झाले आणि त्याचं कौतुक करू लागले.

हेही वाचा : “तुम्ही काय तिचे…” मलायका अरोराला ट्रोल करणाऱ्यांना भारती सिंगचं सडेतोड उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे भारती म्हणाली, “लक्ष्यने फक्त दोनच शब्द शिकले आहेत. एक बाबा आणि दुसरा जय श्री कृष्ण. तो माझं नाव कधी घेतच नाही. आता मी आणखी एका मुलाला जन्म देणार जे माझं असेल. कारण लक्ष्य फक्त बाबा करतो.” आता हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यावर कमेंट करत नेटकरी लक्ष्यचं खूप कौतुक करत आहेत.