रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांचा वेळ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित होता. या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. या चित्रपटाच्या माध्यमातून जिनिलीयाने मराठी मनोरंजन सृष्टीत अभिनेत्री म्हणून पाऊल टाकलं. तर दिग्दर्शक म्हणून हा रितेच देशमुखचा पहिला चित्रपट ठरला. अनेक आठवडे या चित्रपटाला प्रेक्षक तुफान प्रतिसाद देत याचे सर्व शो हाऊसफुल करत होते. ह्या चित्रपटाने ७० हून अधिक कोटींची कमाई केली. तर आता रितेशने या चित्रपटाची कथा, लूक, हूक स्टेप माझ्याकडून चोरली असं अभिनेता भाऊ कदम म्हणाला आहे.

सध्या सर्वत्र ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्याची चर्चा आहे. ‘चर्चा रंगणार बातमी गाजणार’ अशी या पुरस्कार सोहळ्याची यंदाची टॅगलाईन आहे. आज हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला अनेक मान्यवर कलाकारांनी हजेरी लावली. तर रितेश आणि जिनिलीया देखील या पुरस्कार सोहळ्याला उपास्थित होते.

आणखी वाचा : “मराठी चित्रपटांतील विनोदाचा दर्जा…” रितेश देशमुखचं वक्तव्य चर्चेत

या पुरस्कार सोहळ्यामध्ये भाऊ कदमने रितेश देशमुखच्या वेड चित्रपटातील त्याचा लूक केला आहे. त्या लूकमध्ये स्टेजवर येऊन सर्वांसमोर त्याने त्याचं म्हणणं मांडलं. तो स्टेजवर आला आणि म्हणाला रितेश देशमुखने माझा लूक आणि माझी स्टाईल चोरली आहे. वेड या चित्रपटात वेड लावलंय ही हूक स्टेप नसून अंघोळ झाल्यावर मी ज्या पद्धतीने डोकं पुसतो ते पाहून रितेशने ही स्टेप चित्रपटात घेतली. त्याच्या या विनोदी शैलीने रितेश देशमुख आणि जिनिलीयाला देखील हसू आवरलं नाही.

हेही वाचा : अशोक मामा व निवेदिता सराफ यांनी सायली संजीवला दिली खास भेट; खुलासा करत अभिनेत्री म्हणाली, “त्यांनी माझ्यासाठी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्थातच भाऊ कदमने ही तक्रार अगदी गमतीत केली. तर भाऊ कदम बरोबर श्रेयस तळपदे आणि निलेश साबळे देखील त्याच्या या विनोदात सहभागी झाले. तर याच बरोबर शेवटी रितेश देशमुख, जिनिलीया यांनी स्टेजवर येत भाऊ कदम, श्रेयस तळपदे आणि निलेश साबळे यांच्याबरोबर वेड लावलंय या गाण्यावर नाचही केला. ही सगळी मजा मस्ती प्रेक्षकांना आज संध्याकाळी या कार्यक्रमात पाहता येणार आहे.