‘बिग बॉस’ या बहुचर्चित शोच्या सुत्रसंचालनाची धुरा गेली कित्येक वर्ष अभिनेता सलमान खान सांभाळत आहे. पण आता एक नवा ट्विस्ट आला आहे. सलमानला डेंग्यूची लागण झाली आहे. त्यानंतर या शोच्या सुत्रसंचालनाची धुरा कोण सांभाळणार याबाबत प्रश्नचिन्ह होतं. आता पुढील काही दिवस दिग्दर्शक करण जोहर शोच्या सुत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे. सलमानला डेंग्यू झाला म्हटल्यावर त्याचे चाहते चिंतेत होते. आता त्याच्या प्रकृतीबाबत नवी माहिती समोर आली आहे.
‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, सलमानच्या मॅनेजरने त्याच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. “सलमान खान आता ठिक आहे. तसेच दिवाळीनंतर तो चित्रीकरणाला सुरुवात करेल.” असं सलमानच्या मॅनेजरने सांगितलं आहे.
सलमानला डेंग्यू झाला आहे समजल्यानंतर पुढील काही दिवस तरी ‘बिग बॉस १८’चं सुत्रसंचालन तो करणार नसल्याचं समोर आलं. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही नाराजी होती. पण आता दिवाळीनंतर तो पुन्हा एकदा नव्या जोमाने आपल्या कामाला सुरुवात करणार असल्याचं समोर आलं आहे.
आणखी वाचा – Video : कराडजवळील गावी गेला अन् शेतात ट्रॅक्टर चालवताना दिसला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, व्हिडीओ व्हायरल
डॉक्टरांनी सध्यातरी सलमानला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. ‘बिग बॉस १६’चं सुत्रसंचालन करण्यासाठी करणला जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्याने लगेचच यासाठी होकार दिला. याआधी करणने ‘बिग बॉस ओटीटी’ या शोचे सुत्रसंचालन केले होते.