‘बिग बॉस १६’ हा शो दिवसेंदिवस रंजक ठरत आहे. या घरातील स्पर्धक अंकित गुप्ताला गेल्या आठवड्यामध्ये एलिमिनेट करण्यात आलं. होस्ट सलमान खानने घरातील सर्व सदस्यांना बजर दाबून शोमध्ये कमीत कमी योगदान करणाऱ्या स्पर्धकाला एलिमिनेशनसाठी नॉमिनेट करण्याचा पर्याय घरातील सदस्यांना दिला. या प्रक्रियेदरम्यान, अंकितला घरातील सदस्याकडून सर्वाधिक मतं मिळाली आणि त्याला घराबाहेर काढण्यात आलं. आता त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – अभिनेत्री रेशम टिपणीसवर कोसळला दुःखाचा डोंगर, आईच्या निधनानंतर भावूक होत म्हणाली, “तुझा फोन मला…”

अंकिताचा हा व्हिडीओ एका हॉटेल रूममधील आहे. त्याच्या रूममध्ये एक मुलगी दिसत आहे. या व्हिडीओवरुनच आता विविध चर्चा रंगत आहेत. अंकितचा हा व्हिडीओ एका मुलाखतीदरम्यानचा आहे. मुलाखत देत असताना आपल्या मागच्या बाजूला बेडवर मुलगी आहे हे अंकितला सुरुवातीला लक्षात आलं नाही.

त्याने मुलाखत देत असताना काही वेळानंतर पाठी मुलगी दिसतेय हे कळताच लगेचच कॅमेरा अँगल बदलला असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. अंकितने स्वतःकडे कॅमेरा वळवल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला विविध प्रश्न विचारण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा – Video: अक्षय कुमारचा असह्य अवतार…नेटकऱ्यांआधी बायकोकडूनच झाला ट्रोल

अंकित तुझी ही गर्लफ्रेंड आहे का? आता प्रियांकाचा पत्ता कट अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून केल्या आहेत. तर काहींनी अंकितला पाठिंबा दिला आहे. जेव्हा अंकित मुलाखत देत होता तेव्हा त्याच्या रूममध्ये पाच लोक होते असंही काहींनी म्हटलं आहे. पण या सगळ्या प्रकाराबाबत अंकितने मौन पाळलं आहे.