‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचं विजेतेपद शिव ठाकरेने पटकावलं. ‘बिग बॉस’मुळेच नावारुपाला आलेल्या शिवने हिंदी ‘बिग बॉस’मध्ये जाण्याचं स्वप्न पाहिलं. ‘बिग बॉस १६’मध्ये प्रवेश करत तो या शोच्या टॉप २ पर्यंत पोहोचला. एमसी स्टॅन ‘बिग बॉस १६’चा विजेता असला तरी शिववरही प्रेक्षक तितकंच भरभरुन प्रेम करत आहेत. प्रेक्षकांचं आपल्यवर किती प्रेम आहे हे शिवने नुकतचं नागपूर विमानतळावर अनुभवलं.

आणखी वाचा – “आता त्या व्यक्तीचं तोंडही बघणार नाही” ‘बिग बॉस १६’चं विजेतेपद मिळाल्यानंतर कोणावर भडकला एमसी स्टॅन?

शिवच्या चाहतावर्गामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शिवच आमच्यासाठी ‘बिग बॉस १६’चा खरा विजेता आहे असं त्याचे चाहते सातत्याने म्हणत आहेत. मुळचा अमरावतीचा असणार शिव आता त्याच्या घरी पोहोचला आहे. तो जेव्हा नागपूर विमानतळावर पोहोचला तेव्हा एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. शिवला भेटण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

पाहा व्हिडीओ

ढोल-ताशांच्या गजरामध्ये शिवचं स्वागत करण्यात आलं. तसंच त्याला ओवाळलं आणि शिववर फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी शिवही ढोल-ताशांच्या तालावर थिरकला. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तसेच शिवलही चाहत्यांचं आपल्यावर असणारं प्रेम पाहून भारावून गेला.

आणखी वाचा – “आमच्या दोघांमध्ये…” शिव ठाकरेबरोबर रिलेशनशिपच्या चर्चांवर निमृत कौरने सोडलं मौन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवने स्वतःच्या हिंमतीवर कलाक्षेत्रात त्याचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. ‘रोडिज’ या शोमध्येही सहभाग घेत त्याने स्वतःला सिद्ध केलं. आता त्याला मराठी चित्रपट व इतर प्रोजेक्ट्ससाठी विचारणा होत आहे. शिव आता मराठी मालिका, चित्रपट किंवा इतर कोणता शो करणार का? हे पाहावं लागेल.