बिग बॉस १६ च्या विजेत्याची घोषणा होण्यापूर्वीच चाहत्यांकडून विजेता कोण होणार याचे अंदाज बांधले जात आहेत. या शोच्या महाअंतिम सोहळ्यासाठी प्रियांका चहर चौधरी, शिव ठाकरे, एमसी स्टॅन, अर्चना गौतम यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. सर्व स्पर्धकांमध्ये तगडी स्पर्धा असल्याचं पाहायला मिळत आहे. आज रात्री बिग बॉस १६ चा महाअंतिम सोहळा पार पडणार असून यंदाच्या ट्रॉफीवर कोणाचं नाव कोरलं जाणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

बिग बॉस १६ चा महाअंतिम सोहळा कलर्स टीव्हीवर दाखवला जाणार आहे. याशिवाय ओटीटी प्लॅटफॉर्म Voot आणि जिओ टीव्हीवरही प्रेक्षकांना हा शो पाहता येणार आहे. बिग बॉस १६ च्या विजेत्याला गोल्ड यूनिकॉर्नच्या डिझाइनची चमकदार ट्रॉफी दिली जाणार आहे. याशिवाय अगोदर बक्षिसाची रक्कम टास्कमध्ये कमी करून शुन्यवर आली होती. मात्र आता ती २१ लाख ८० हजार एवढी असणार आहे आणि विजेत्या स्पर्धकाला हे पैसे मिळणार आहेत. तसेच त्याला ग्रँड आय १० कारही बक्षिस म्हणून मिळणार आहे.

आणखी वाचा- बिग बॉस १६ : अमरावतीत शिव ठाकरेच्या जेतेपदासाठी गल्‍लोगल्‍ली प्रार्थना; कुठे होम-हवन, तर कुठे…

सोशल मीडियावर आणि स्पर्धकांचे चाहते आतापासूनच विजेत्याच्या नावाबद्दल अंदाज बांधताना दिसत आहेत. सर्वाधिक नेटकऱ्यांच्या मते अभिनेत्री प्रियांका चहर चौधरी या सीझनची विजेती असणार आहे. तर शिव ठाकरे पहिला रनरअप ठरणार आहे. इंडियन एक्सप्रेसनेही त्यांच्या पोलमध्ये असेच काहीसे दावे केले आहेत. तसेच या शोच्या महाअंतिम सोहळ्यात स्पर्धकांचे धमाकेदार परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहेत.

आणखी वाचा- “अशा स्त्रीबरोबर राहणं…”, दोन लग्नं, घटस्फोट अन् शबाना आझमींबद्दल जावेद अख्तर यांचं वक्तव्य चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान बिद बॉस १६ ऑक्टोबर महिन्यात सुरु झाला होता ज्यात १६ स्पर्धक सहभागी झाले होते. ज्यात अब्दु रोजिक, टीना दत्ता, एमसी स्टेन, सौंदर्य शर्मा, साजिद खान, श्रीजिता डे, सुंबुल तौकीर, निमृत कौर अहलूवालिया, मान्या सिंह, शिव ठाकरे, शालीन भानोत, अर्चना गौतम, प्रियांका चौधरी, अंकित गुप्ता, गौरी नागोरी, गौतम विग यांचा समावेश होता. महाअंतिम सोहळ्याचं सूत्रसंचालन सलमान खान करणार आहे.