मराठमोळा शिव ठाकरे सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. शिव ठाकरेचं बिग बॉस १६ चा विजेता होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही मात्र त्याने लाखो लोकांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावर शिवसाठी अनेकांनी पोस्टही केल्या आहेत. शिवला सोशल मीडियावर बराच पाठिंबा मिळताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर शिव ठाकरे सर्व सदस्यांबरोबर पार्टी करताना दिसला. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

बिग बॉस फिनाले नंतरची पार्टी यावेळी फराह खानच्या घरी झाली. या पार्टीमध्ये सर्वच सदस्यांनी धम्माल मस्ती केलेली पाहायला मिळाली. या पार्टीमध्ये शिव ठाकरेने बॉलिवूडचा भाईजान आणि बिग बॉस होस्ट सलमान खानची भेट घेतली. नुकत्याच ‘ई-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सलमान खानशी काय बोलणं झालं याबद्दल शिव ठाकरेनं सांगितलं. सलमान खानने शिव ठाकरेला स्वतःच्या बाजूला बसवून बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा केल्याचं यावेळी शिवने स्पष्ट केलं.

आणखी वाचा- “तो माझ्या आई-बाबांना भेटला आणि…” शिव ठाकरेने सांगितला सलमान खानच्या भेटीचा किस्सा

सलमानबरोबरच्या भेटीबद्दल सांगताना शिव म्हणाला, “मी सरांना भेटलो आणि काही वेळ त्यांच्याबरोबर बसलो. त्यांनी माझ्याशी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. त्यांनी मला काही मराठी प्रोजेक्टबद्दल सांगितलं. माझ्या भविष्यातल्या कामांसाठी त्यांनी काही महत्त्वाचे सल्लेही दिले. खरं सांगू तर मी हवेत होतो कारण सलमान खान सर माझ्या बाजूला बसले होते. माझ्याशी बोलत होते. मला मार्गदर्शन करत होते. त्यांच्याबरोबर बसणं आणि करिअरबद्दल बोलणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. ते क्षण माझ्या नेहमीच आठवणीत राहतील असे आहेत. ते सगळं एखाद्या स्वप्नाप्रमाणे होतं.”

आणखी वाचा- “मेरे बस में नहीं अब…” पाठकबाईंची राणादासाठी रोमँटीक पोस्ट, कमेंट करत हार्दिक जोशी म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सलमान खानने त्याआधी शिव ठाकरे आई-बाबांचीही भेट घेतली होती. शिव ठाकरेच्या आई-बाबांना भेटून तो त्यांच्याशी मराठी भाषेत बोलला याबद्दलही शिव ठाकरेने सांगितलं. तो क्षण माझ्यासाठी अभिमानास्पद होता असं शिव यावेळी म्हणाला होता. आगामी काळात शिव ठाकरे सलमान खानच्या चित्रपटात दिसणार असल्याचं बोललं जात आहे.