‘बिग बॉस’ हिंदीचं १६वं पर्व विविध कारणांमुळे चर्चेचा विषय ठरलं. या पर्वामधील काही सदस्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. यातीलच एक स्पर्धक म्हणजे दिग्दर्शक साजिद खान. चित्रपटसृष्टीमध्ये नाव कमावल्यानंतरही साजिद या शोमध्ये सहभागी झाला. त्याने ‘बिग बॉस’च्या घरातील मंडळींसह प्रेक्षकांचीही मनं जिंकली. पण सध्या तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

आणखी वाचा – “प्राजक्ता माळीबरोबर समलिंगी जोडीदार म्हणून…” विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नावर सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली…

‘बिग बॉस १६’मधील एका स्पर्धकाला साजिद डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सौंदर्या शर्माबरोबर साजिदचं नाव जोडलं जात आहे. शिवाय साजिदने तिला त्याच्या एका चित्रपटामध्ये काम करण्याची संधीही दिली असल्याची चर्चा आहे. पण हे कितपत खरं आहे याबाबत आता सौंदर्याने भाष्य केलं आहे.

सौंदर्या म्हणाली, “साजिद यांच्याबरोबर माझं नाव जोडलं जात आहे हे ऐकूनच मी दुःखी झाले. मी त्यांच्याकडे नेहमीच एक भाऊ, मित्र म्हणून पाहिलं आहे. आजही एखाद्या महिलेचं नाव एका व्यक्तीबरोबर जोडलं जातं आणि तिला बोललं जातं हे पाहूनच मी अस्वस्थ झाली आहे. आम्ही कोणाला डेट करत आहोत या दृष्टीने आम्हाला पाहणं समाजाने आता बंद केलं पाहिजे हिच ती वेळ आहे.”

आणखी वाचा – “गुटखा खाऊन…” लेक वाईट मार्गाला जात आहे कळल्यावर एमसी स्टॅनच्या आई-वडिलांनी घेतला होता ‘तो’ निर्णय, रॅपरचा मोठा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आपण आपल्या आयुष्यामध्ये काय मिळवलं हे समाजाने स्वतःकडे पडताळून पाहणं गरजेचं आहे.” सौंदर्याने साजिदबरोबर असलेल्या नात्याविषयी स्पष्टीकरण देत राग व्यक्त केला. शिवाय साजिदही सतत होणाऱ्या या चर्चांमुळे नाराज असल्याचं तिने सांगितलं. शिवाय सौंदर्या माझी छोटी बहीण आहे, सध्यातरी मी कोणालाच डेट करत नसल्याचं साजिदने सांगितलं होतं.