बिग बॉसचं १६ वे पर्व सुरू होऊन आता जवळपास एक आठवडा उलटून गेला आहे. घरात आता भांडणं, वाद, प्रेम, मैत्री सर्वकाही बघायला मिळत आहे. प्रत्येक स्पर्धकाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची वेगळी जागा तयार करण्यास सुरुवात केली आहे. पण या सगळ्यात वादग्रस्त कारणांनी शालीन भानोत मात्र सातत्याने चर्चेत आहे. मागच्या काही एपिसोडमध्ये त्याचा खूप ड्रामा पाहायला मिळत आहे. आता त्याचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात तो चेकअपसाठी बिग बॉस निर्मात्यांनी पाठवलेल्या डॉक्टरांशी गैरवर्तन करताना आणि त्यांना धमकी देताना दिसत आहेत. शालीनची ही वर्तणूक पाहून नेटकरी मात्र चिडले असून त्याला घरातून बाहेर काढण्याची मागणी होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये शालीन भानोत त्याचं चेकअप करण्यासाठी आलेल्या डॉक्टरला त्याची डिग्री आणि शिक्षणाबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे. दरम्यान शालीन, एमसी स्टॅन आणि साजिद खान यांच्यात जोरदार वाद झाला होता. ज्यानंतर शालीन सातत्याने साजिद खानच्या रागामुळे खूप घाबरला आहे असं सांगताना दिसला. तो ब्लँकेट घेऊन झोपून होता. जेव्हा साजिद खान त्याच्याशी बोलण्यासाठी त्याच्यापाशी गेले तेव्हा त्याने त्यांच्याशी बोलणं टाळलं आणि त्यांची भीती वाटत असल्याचं सांगितलं.
आणखी वाचा- BB16 : सुंबुल- शालीन भानोत यांच्यात जवळीक, दोघांच्या नात्यावर अभिनेत्रीचे वडील म्हणाले, “तिला स्वातंत्र्य…”

शालीनची अवस्था पाहता त्याच्या चेकअपसाठी निर्मात्यांनी डॉक्टरांना पाठवलं होतं. पण त्यांना शालीन धमकी देत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच त्याच्याशी गैरवर्तन करून त्याच्या शिक्षणासंबंधी प्रश्न विचारताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर अनेक युजर्सनी त्याच्या विरोधात भूमिका घेत त्याला घरातून बाहेर करण्याची मागणी केली आहे.

आणखी वाचा- साजिद खानवर शर्लिन चोप्राने पुन्हा केले गंभीर आरोप, गुप्तांगाचा उल्लेख करत म्हणाली “त्याने मला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान याआधी शालीन आणि अर्चना यांच्यात चिकन खाण्यावरून खूप वाद झाले होते, ज्यामध्ये ते अर्चनाला त्याने बरंच सुनावलं होतं. त्याचबरोबर तिच्यावर वैयक्तिक टिप्पणीही केली होती. या सगळ्यामुळे आता शालीनवर जोरदार टीका होताना दिसत आहे. एवढेच नाही तर टास्कदरम्यान शालीनने अर्चनाला धक्काबुक्कीही केली. मात्र, बिग बॉसने हे जाणूनबुजून केले नसल्याचे सांगितले. कॅप्टन गौतमने त्याला दोषी ठरवल्यामुळे, शालीनला अशी शिक्षा मिळाली आहे की तो घरात कधीही कॅप्टन होऊ शकत नाही आणि त्याला सरळ २ आठवड्यांसाठी घरातून बाहेर पडण्यासाठी नॉमिनेट केले गेले आहे.