‘बिग बॉस हिंदी’चं १६वं पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पण, ‘बिग बॉस’च्या घरात बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खानला पाहून प्रेक्षक नाखूश होते. अनेक सेलिब्रिटींनीही ‘बिग बॉस’च्या घरात साजिद खानला पाहून संताप व्यक्त केला. दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून साजिद खानला बिग बॉसमधून काढून टाकण्याची मागणी केली आहे.

मीटू प्रकरणात अडकल्यामुळे चर्चेत आलेल्या साजिद खानवर अभिनेत्री शर्लिन चोप्राने पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. शर्लिनने ट्वीट करत साजिदवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. “साजिद खानने मला त्याचे गुप्तांग दाखवून शून्य ते १० दरम्यान रेटिंग दे असं म्हटलं होतं. आता मला ‘बिग बॉस’च्या घरात जाऊन त्याला रेटिंग द्यायचं आहे. विनयभंग करणाऱ्या व्यक्तीबरोबर पीडित महिला कसा व्यवहार करते, हेदेखील देशाला बघू दे. सलमान खान कृपया तुम्ही याबद्दल काहीतरी भूमिका घ्या”, असं म्हणत तिने सलमान खानला ट्वीटमध्ये टॅग केलं आहे.

हेही वाचा >> …अन् अमिताभ बच्चन यांच्या नावामुळे इराणमध्ये सुधा मूर्तींना मिळाली होती मोफत सेवा; स्वत:च सांगितला किस्सा

हेही वाचा >> “…अन् अमिताभ माझ्या पायाशी वाकले”; समीर चौघुलेने सांगितला KBCच्या सेटवरील ‘तो’ स्वप्नवत किस्सा

शर्लिनने काही वर्षांपूर्वी साजिद खानवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. ‘फिल्मीबीट’ला दिलेल्या मुलाखतीत तिने ‘बिग बॉस’च्या घरात साजिद खानला पाहून नाराज असल्याचं म्हटलं आहे. “साजिदने सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीचा विनयभंग केला असता, तर त्याने अशा व्यक्तीला ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री दिली असती का? ज्या महिलांनी साजिद खानच्या विरोधात त्यांचे लैंगिक शोषण केल्यामुळे आवाज उठवला त्यांच्या भावनांचं काय?”, असं ती म्हणाली.

हेही पाहा >> Photos : भाग्यश्री मोटेच्या साखरपुडा सोहळ्यात हृतिक रोशनला पाहून चाहत्यांना पडला प्रश्न, जाणून घ्या कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बिग बॉस’च्या घरात साजिद खानची एन्ट्री झाल्यापासूनच त्याला शोमधून काढून टाकण्याची मागणी होत आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी याविरोधात भाष्य केलं आहेत. तर राखी सावंत आणि कश्मिरा शाहने साजिदला पाठिंबा दर्शविल्यामुळे त्यांना ट्रोल केलं जात आहे.