Bigg Boss 17 Updates: ‘बिग बॉस’ हिंदीचे १७ वे पर्व सुरू आहे. या पर्वात मागच्या दोन आठवड्यांपासून इशा मालवीय व अभिषेक कुमार यांच्या नात्याची जोरदार चर्चा होती. ब्रेकअप झाल्यानंतर दोघेही या शोमध्ये सहभागी झाले होते. दोघांची भांडणं व रुसवे फुगवे सुरू होते, अशातच शोमध्ये इशाचा सध्याचा बॉयफ्रेंड समर्थची एंट्री झाली. समर्थ आल्यावर तो आपला बॉयफ्रेंड नसल्याचं इशाने म्हटलं. मात्र नंतर तिने ते मान्य केलं. वीकेंडच्या या रंजक एपिसोडनंतर आता शोचा नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये दोन विवाहित जोडप्यांचं भांडण पाहायला मिळत आहे.

“मी तिच्याइतकी सुंदर नाही पण…”, ‘या’ अभिनेत्रीने साकारावी आपली भूमिका, सुधा मूर्तींची इच्छा

या शोमध्ये अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन, तसेच ऐश्वर्या शर्मा व तिचा पती नील भट्ट सहभागी झाले आहेत. कलर्स टीव्हीवर शेअर करण्यात आलेल्या नव्या प्रोमोत विकीवर ऐश्वर्या संतापल्याचं पाहायला मिळत आहे. नील आणि ऐश्वर्याच्या नात्याबद्दल विकी असं काही बोलला की ऐश्वर्याचा राग अनावर झाला आणि ती विकीला फटकारताना दिसत आहे.

“संविधान गुंडाळू पाहणार्‍या व्यवस्थेला…” मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाबद्दल किरण मानेंची पोस्ट; म्हणाले, “आम्हाला तुमची…”

प्रोमोमध्ये असं दिसतंय की घरातील काही स्पर्धक गार्डन परिसरात निवांत बसून गप्पा मारताना दिसत आहेत. यादरम्यान विकी नीलची मस्करी करतो. तो नीलला म्हणतो , “डेट करताना तू चुकून ऐश्वर्याला म्हणाला होतास का की असं करताना तू खूप क्यूट दिसतेस”. उत्तरात नील हसत हसत म्हणतो की, “आम्ही डेट केले नाही, आम्ही लगेच लग्न केले”, त्यानंतर विकी जोरात हसताना दिसतोय. विकीचं हे वागणं ऐश्वर्याला हे अजिबात आवडत नाही आणि ती खूप चिडते. त्यानंतर ती नीलशी याबद्दल बोलतानाही दिसते. ती विकी व अंकिताच्या भांडणावरून म्हणते की विकीच्या स्वतःच्या लग्नाचा पत्ता नाही आणि तो आपल्या वैयक्तिक आयुष्यावर टिप्पणी कशी काय करू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ऐश्वर्या म्हणते की इथे फक्त तूच (विकी) पीडित माणूस आहे. त्यावर विकी म्हणतो की तुला असं का वाटतंय. त्यानंतर दोघांमध्ये जोरात वाद सुरू होतो आणि ऐश्वर्या जोरजोरात म्हणते की तू दुसऱ्यांच्या नात्यावर बोलण्याची गरज नाही आणि प्रत्येक पुरुष तुझ्यासारखा नसतो. हा प्रोमो पाहता आजच्या एपिसोडमध्ये ऐश्वर्या व विकीचं जोरदार भांडण पाहायला मिळणार आहे. या भांडणात अंकिता पडते की नाही ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण या घरात आल्यानंतर अंकिता व विकीच्या नात्यातही बरेच चढ-उतार पाहायला मिळाले आहेत.