सलमान खानचा लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चं १७वं पर्व सध्या जोरदार सुरू आहे. या पर्वाची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. यंदाच्या पर्वाची थीम हटके असल्यामुळे शो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. सध्या या शोमधील लोकप्रिय स्पर्धक कपल असलेल्या अंकिता लोखंडे आणि विक्की जैन यांच्यासंदर्भात एक चर्चा जोरदार रंगली आहे. लवकरच अंकिता गुडन्यूज देणार असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अंकिता लोखंडेने सर्व स्पर्धकांसमोर बोलली होती की, तिला आंबट खावसं वाटतंय. अभिनेत्रीचं हे बोलणं ऐकून बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना आश्चर्याचा धक्का बसला. मग ते अंकिताबरोबर प्रेग्नेंसीबाबत बोलताना पाहायला मिळाले. आता अभिनेत्रीने प्रेग्नेंसी टेस्ट केल्याचं समोर आलं आहे. याचा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. हेही वाचा - Video: लिपस्टिकच्या ‘त्या’ वादावर आलिया भट्टने सोडलं मौन; रणबीर कपूरला ‘टॉक्सिक’ म्हणणाऱ्यांना अभिनेत्रीनं दिलं सडेतोड उत्तर या व्हायरल व्हिडीओमध्ये अंकिता विक्कीशी बोलताना म्हणते की, "माझी प्रेग्नेंसी टेस्ट घेतली आहे. आतमध्ये काही आहे की नाही हे पाहण्यासाठी." यावर विक्की म्हणतो, "आज झाली ना?" त्यानंतर अंकिता म्हणजे, "विक्की, काल टेस्ट झाली होती. त्यानंतर मी काम केली. आज रिपोर्ट्स नाही आले. काही युरीन टेस्टपण झाल्या आहेत. माझ्याबाबतीत वर-खाली गोष्टी होत आहेत. मला काहीतरी होतंय. मी खूप कन्फ्यूज आहे यार. मी तुला दोष देत नाही आणि कोणालाच काही बोलत नाहीये. मी खूप त्रस्त आहे, मला काही समजत नाहीये." पण जर अंकिताची प्रेग्नेंसीची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर बिग बॉसच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडणार आहे. हेही वाचा – “माझ्याकडून शंभर पैकी….”, दिग्दर्शक विजू मानेंची ‘नाळ २’ चित्रपटाविषयी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत हेही वाचा – “… तर आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन काहीतरी वेगळाच असता”, ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीची ‘त्या’ व्यक्तीसाठी खास पोस्ट दरम्यान, अंकिता आणि विक्कीबद्दल बोलायचं झालं तर दोघांनी पाच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर १४ डिसेंबरला लग्नीनगाठ बांधली. यापूर्वी अभिनेत्रीचं नाव दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबरोबर जोडलं गेलं होतं. अंकिता आणि सुशांत ६ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.