Bigg Boss 17 Update: ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यापूर्वी घरातील दोन सदस्य बेघर झाले आहेत. शनिवारी शेवटच्या वीकेंड वारच्या सुरुवातीला वाइल्ड कार्ड म्हणून आलेली आयशा खान शो बाहेर झाली. त्यानंतर काल, रविवारी इशा मालवियाचा प्रवास थांबला. तिच्या जाण्याने अंकिता लोखंडे, विक्की जैन भावुक झालेले पाहायला मिळाले. शिवाय इशाचा एक्स बॉयफ्रेंड अभिषेक कुमार देखील ढसाढसा रडताना दिसला.

‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाच्या सुरुवातीला इशा मालविया व अभिषेक कुमारची चांगली मैत्री पाहायला मिळाली. पण इशाचा बॉयफ्रेंड समर्थ जुरेलच्या एन्ट्रीनंतर इशा व अभिषेक सतत भांडताना दिसले. पण आता दोघं एकमेकांची माफी मागताना पाहायला मिळाले. काल, या पर्वाच्या शेवटच्या वीकेंडच्या वारला सलमान खानने इशा बेघर झाल्याचं जाहीर केलं. हे ऐकून घरातील सदस्य हैराण झाले. इशाला निरोप देताना अंकिता लोखंडेसह विक्की जैन भावुक झाले. तसंच अभिषेक जोरजोरात रडू लागला. त्याला इशाचं नाव ऐकताच अश्रू अनावर झाले होते.

हेही वाचा – Video: झेंडा नाचवत, जय श्रीरामाचा जयघोष करत अभिनेत्याचा डान्स; नेटकरी म्हणाले, “क्या बात है..”

इशाला निरोप देताना अभिषेक म्हणाला की, तू घरातून बेघर व्हावी, अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. तुला असं वाटतं होतं. पण माझ्या मनात तसं काही नव्हतं. यानंतर इशा म्हणाली, “मी जे काही झालं त्या सगळ्यांसाठी मी माफी मागते.” तेव्हा अभिषेकने देखील इशाची माफी मागितली. पुढे इशा म्हणाली, “आता आपला विषय इथेच संपतोय. मी तुझ्याबद्दल वाईट बोलणार नाही. तू ही बोलू नकोस. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. पुढे खूप चांगला खेळ.”

हेही वाचा –Bigg Boss 17: ‘बिग बॉस १७’मधून बाहेर येताच आयशा खानचा मुनव्वर फारुकीवर निशाणा, पोस्ट करत म्हणाली, “पिक्चर अभी बाकी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, इशा गेल्यानंतरही अभिषेक वॉशरूममध्ये जाऊन खूप रडला. बराच काळ स्वतःला वॉशरूममध्ये बंद करून अभिषेक जोरजोरात रडत म्हणत होता की, इशा मला माफ कर. त्यावेळेस मुनव्वर त्याला समजवतं होता. पण अभिषेकने सांगितलं की, त्याला काही वेळ एकट्यालाच राहायचं आहे.