लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीला ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचे विजेतेपद जिंकल्यापासून मोठं-मोठे प्रोजेक्ट मिळत आहे. काही रिअ‍ॅलिटी शोमध्ये तो झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण मुनव्वरने स्वतः याबाबत अधिकृतरित्या जाहीर केलेलं नाही. अशात मुनव्वरचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये त्याच्याबरोबर हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री पाहायला मिळत आहे.

मुनव्वर फारुकीला या प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर पाहून चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. दोघांच्या फोटोंवर मुनव्वरच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘सुपर जोडी’, ‘दोघांना एकत्र पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे’, ‘दोघं खूपच सुंदर दिसतायत’, ‘एक नंबर मुनव्वर भाई’, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी या व्हायरल फोटोवर दिल्या आहेत.

हेही वाचा – लग्नाच्या चर्चांदरम्यान ‘बिग बॉस’मधील ‘या’ लोकप्रिय जोडीचे ब्रेकअप, अभिनेत्री म्हणाली, “५ महिन्यांपूर्वीच…”

या व्हायरल फोटोमध्ये मुनव्वरबरोबर असलेली ही अभिनेत्री आहे हिना खान. मुनव्वर व हिना कोलकातामध्ये एका म्युझिक व्हिडीओचं शूटिंग करत आहेत. या शूटिंगदरम्यानचे दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान चर्चेत आले आहेत. या फोटोमध्ये हिना बंगाली लूकमध्ये दिसत आहे. तर मुनव्वर पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – अंकिता लोखंडेचं कंगना रणौतशी आहे बहिणीसारखं नातं, म्हणाली, “बिग बॉसमधील माझी-विकीची भांडणं पाहून तिला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गेल्या महिन्यात ‘बिग बॉस १७’चा महाअंतिम सोहळा पार पडला. प्रेक्षकांच्या बहुमताने मुनव्वर या पर्वाचा विजेता ठरला. त्याला ‘बिग बॉस १७’च्या ट्रॉफीसह ५० लाखांचा चेक आणि Hyundai Creta गाडी बक्षीसस्वरुपात दिली गेली.