Bigg Boss 18: नुकताच ‘बिग बॉस’च्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडला. या नॉमिनेशन टास्कमध्ये सात जणांना नॉमिनेट करण्यात आलं. विवियन डिसेना, अविनाश मिश्रा, ईशा सिंह, चाहत पांडे, रजत दलाल, सारा अरफीन खान आणि कशिश कपूर यांच्यावर घराबाहेर जाण्यासाठी टांगती तलावर आहे. त्यामुळे १२व्या आठवड्यात कोण घराबाहेर होतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशातच चुम दरांग नवी ‘टाइम गॉड’ झाल्याचं समोर आलं आहे.

‘कलर्स टीव्ही’च्या इन्स्टाग्राम पेजवर ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये, ‘बिग बॉस’ घोषित करत आहेत की, घरातील रेशन धोक्यात आणून चुम दरांग नवी ‘टाइम गॉड’ झाली आहे. त्यानंतर करणवीर मेहरा चुमला मिठी मारून दोघं आनंद साजरा करताना दिसत आहेत. चुम ‘टाइम गॉड’ झाल्यामुळे घराला एक लिंबू मिळाल्याच ‘बिग बॉस’ सांगत आहेत. यावेळी करण-चुम हसतात. पण त्यानंतर घरात राडा होतो.

हेही वाचा – Bigg Boss 18: नॉमिनेशन टास्कमध्ये श्रुतिका अर्जुनला दिला ‘हा’ महत्त्वाचा अधिकार; विवियन डिसेना, चाहत पांडेसह सात सदस्य झाले नॉमिनेट

रेशनच्या बदल्यात चुम दरांग ‘टाइम गॉड’ झाल्यामुळे अविनाश भांडताना दिसत आहे. चुम स्वार्थी असल्याचं म्हणत आहे. यावरून नंतर करणवीर मेहरा आणि रजत दलालमध्ये जोरदार भांडण पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता चुमच्या ‘टाइम गॉड’ पदावरून काय-काय होतंय, हे २४ डिसेंबरच्या भागात पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी’ विजेता लवकरच चढणार बोहल्यावर, आनंदाची बातमी देत सांगितली लव्हस्टोरी

दरम्यान, चुमला लगेचच ‘टाइम गॉड’च्या खुर्चीवरून उतरवलं गेल्याचं म्हटलं जात आहे. याच कारण आहे सारा अरफीन खान. ‘बिग बॉस’ चुमला आदेश देतात की, घरातील सर्व रेशन स्टोर रुममध्ये ठेवायचं. पण यावेळी सारा रेशनमधील काही सामान चोरी करते. त्यामुळे करणवीर आणि चुम साराला चोरी केलेलं रेशन स्टोर रुममध्ये ठेवण्याची विनंती करतात. पण, सारा आपला निर्णय बदलत नाही. त्यामुळे ‘बिग बॉस’ने चुमकडून लगेचच ‘टाइम गॉड’चं पद हिसकावून घेतल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा – शुभमंगल सावधान! ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्याचा मोठ्या थाटामाटात पार पडला लग्नसोहळा, गेल्या नऊ वर्षांपासून होता रिलेशनशिपमध्ये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या आठवड्यात मिड वीक एविक्शन आणि डबल एविक्शन पाहायला मिळालं. मिड वीक एविक्शनमध्ये दिग्विजय सिंह राठी घराबाहेर झाला. त्यानंतर डबल एविक्शनमध्ये एडिन रोज, यामिनी मल्होत्रा बेघर झाल्या.