Bigg Boss 19 Basir Ali and Pranit More fight : ‘बिग बॉस’च्या घरातली भांडणं आणि वादविवाद ही काही नवीन गोष्ट नाही. रोज काही ना काही नवं घडताना दिसतं. या घरात कधी जेवण, कधी घरकाम यावरून, तर कधी टास्कदरम्यान स्पर्धक एकमेकांवर चिडतात, आरडाओरड करतात आणि भांडतातदेखील.

नुकत्याच झालेल्या भागात बसीर अली आणि प्रणीत मोरे यांच्यात चांगलाच वाद झाला. प्रणीत मोरे व अमाल मलिक यांच्यातील शाब्दिक बाचाबाचीत बसीर अली आणि दोघे एकमेकांना चांगलेच भिडले. प्रणीत मोरेने व अमाल मलिक यांच्यातील वादात बसीरनं मध्यस्थी करीत अमालला शांत राहायला सांगितलं. मात्र, हे प्रणीतला खटकलं आणि त्यानं बसीरवर टिप्पणी केली.

काही क्षणांतच तिघे एकमेकांशी वाद घालू लागले. या भांडणात बसीरनं प्रणीतला टोचून म्हटलं, “तू ४००–५०० शो केलेस तरी कोणी तुला ओळखत नाही.” त्यावर प्रणीतनंही बसीरला “तुलाही कुणी ओळखत नाही!” म्हणत उत्तर दिलं. त्यानंतर वाद आणखीनच चिघळला.

यावेळी अमालनं प्रणीतला मारण्याचीही धमकी दिली. त्याबद्दल अमाल प्रणीतला म्हणाला, “शोमध्ये जर मारायची परवानगी असती, तर तुला चांगलंच दाखवलं असतं.” त्यावर प्रणीतनंही त्याला “हिंमत असेल, तर मला मारून दाखव” असं सुनावलं. या भांडणादरम्यान प्रणीत आवाज काढत त्यांना चिथावत होता, तेव्हा बसीरनं त्याला, “कुत्र्यासारखे आवाज काढू नको”, असं म्हटलं. मात्र प्रणीत तरीही बसीरला चिडवतच होता. त्यानंतर बसीरनं प्रणीतला, “तू या घरातून बाहेर गेलास तरी कुणाला काही फरक पडणार नाही,” असं म्हटलं. त्यावर प्रणीतनंही त्याला, “तुझ्या जाण्यामुळे घरात शांतता राहील”, असं उत्तर दिलं.

या भांडणादरम्यान, अमाल वारंवार प्रणीतच्या अंगावर धावत जाऊन, त्याला स्पर्श करीत होता. त्यावरून प्रणीतही त्याला असं करून नकोस, म्हणत त्याच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करतो. पुढे झीशान आणि आवेज अमालला बाजूला नेत, या घरात कुणाच्याही शरीराला स्पर्श करण्याची परवानगी नसल्याचं सांगत, त्याची समजूत काढू लागतात.”

दरम्यान, या भांडणानं घरातील वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. आता पुढच्या भागात या भांडणाचा टास्क आणि इतर सदस्यांवर काय परिणाम होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.