Bigg Boss 19 Fame Awez Darbar’s Ex Girlfriend’s Post : ‘बिग बॉस १९’ मधून आवेज दरबार अलीकडेच बाहेर पडला आणि या पर्वातील त्याचा खेळ थांबला. आवेज ‘बिग बॉस’च्या घरात सुरुवातीला त्याच्या व या कार्यक्रमातील स्पर्धक आणि त्याची मैत्रीण नगमा मिराजकरबरोबरच्या नात्यामुळे चर्चेत होता. अशातच काही दिवसांपूर्वी त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याच्याबरोबरच्या नात्याबद्दल प्रतिक्रिया देत त्याने तिची फसवणूक केल्याचं म्हटलेलं.

‘फ्री प्रेस जरनल’च्या वृत्तानुसार आवेजच्या एक्स गर्लफ्रेंडने म्हणजेच शुभी जोशीने त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देत सांगितलेलं की, त्याने तिची फसवणूक केलेली. कामामुळे वेळ नाही म्हणत भेटण्याचं टाळायचं, पण तिच्याच मैत्रिणींना मेसेज करून भेटायला बोलवायचा. अशातच आता सोशल मीडियावर पोस्ट करत तिला जिवे मारण्याची धमकी येत असल्याचं म्हटलं तिने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे.

‘बिग बॉस १९’ फेम आवेज दरबारच्या एक्स गर्लफ्रेंडची पोस्ट चर्चेत

‘स्प्लिट व्हिला’मुळे चर्चेत आलेल्या शुभी जोशीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आता आवेजबरोबरच्या ब्रेकअपबद्दल विधान केल्याने तिला धमक्या येत असल्याचं म्हटलं आहे. पोस्टमधून ती म्हणाली, “गेल्या काही दिवसांत मी आयुष्यातले सर्वात कठीण क्षण अनुभवले. मला ट्रोल केलं गेलं, शिवीगाळ करण्यात आली, धमक्या आल्या आणि माझाच अनुभव सांगितल्याबद्दल लोकांनी मला दोष दिला. एका पॉडकास्टमध्ये मला याबद्दल विचारण्यात आलं आणि मी प्रामाणिकपणा निवडला, मी फक्त जे खरं आहे ते सांगितलं पण कोणाचं नाव खराब करण्यासाठी मी काहीही केलेलं नाही.”

शुभी पुढे म्हणाली, “प्रत्येक जण कुणाच्या तरी गोष्टीत चुकीचा असतो आणि तेही ठीक आहे. मी जे सत्य होतं तेच बोलले आणि त्यावर ठाम आहे. हो, माझ्या बोलण्याचे परिणाम काय होतील याची मला कल्पना नव्हती. पण, मला कुठल्याही पुरुषाच्या नावाचा आधार घेऊन प्रसिद्धीसाठी काहीही करायचं नाही. देवाचा मला आशीर्वाद आहे आणि मी माझं करिअर स्वबळावर करत आहे.”

तिने पुढे सांगितलं की, तिला जो द्वेष सहन करावा लागला तो अत्यंत क्रूर होता. त्यात शिवीगाळ, अपमानास्पद शब्द, चारित्र्यावर शिंतोडे उडवणे, इतकंच नाही तर तिच्या आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना जिवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. शुभीने पुढे म्हटले की, “कोणालाही ते सत्य बोलल्याबद्दल धमकावलं जाऊ नये, ट्रोल करू नये किंवा त्याचं माणूसपण हिरावून घेतलं जाऊ नये. ऑनलाइन ट्रोलिंगमुळे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर कितीतरी गंभीर परिणाम होतो.”

ट्रोलिंगबद्दल आवेज दरबारची एक्स गर्लफ्रेंड पुढे म्हणाली, “ट्रोलिंग मानसिक आरोग्यावर प्रचंड परिणाम करतं. शेवटी मीसुद्धा एक माणूसच आहे. मलाही भावना आहेत, कुटुंब आहे आणि मर्यादाही आहेत. रोज सकाळी असे वाईट मेसेजेस पाहत जागं होणं, चिंता आणि अस्वस्थतेनं भरलेली झोपेची रात्र… हे सगळं तुम्हाला बेचैन करतं. स्वतःवरच प्रश्न निर्माण करायला लावतं; विशेषतः माझ्यासारख्या मुलींसाठी, ज्या प्रत्येक अडथळ्याशी झुंज देत आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.”