Bigg Boss 19 Fame Actor’s Wife Shared A Post : ‘बिग बॉस १९’मध्ये हिंदी टेलिव्हिजनवरील कलाकार, बॉलीवूड सेलिब्रिटी ते सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसर अशा अनेकांनी सहभाग घेतला आहे. यातील स्पर्धक कुठल्या न कुठल्या कारणामुळे नेहमी चर्चेत असतात. अशातच आता या शोमधील एका स्पर्धकाच्या बायकोने त्याच्यासाठी पोस्ट केली आहे.
गौरव खन्ना हा हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. आजवर त्याने विविध मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात येण्यापूर्वी काही दिवसांआधी तो ‘स्टार प्लस’वरील लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’मध्ये झळकलेला. यातील त्याच्या भूमिकेला अनेकांची पसंती मिळालेली. परंतु, ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून तो रोज कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं.
गौरवच्या बायकोने अभिनेत्री आकांक्षाने अशातच त्याच्या आठवणीत पोस्ट शेअर केली आहे. गौरव ‘बिग बॉस’च्या घरात गेल्यापासून तिने आतापर्यंत एकदाही त्याच्यासाठी कुठलीही पोस्ट शेअर केलेली नव्हती, त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये याबद्दल सोशल मीडियावर चर्चाही सुरू होती आणि आकांक्षाला यासाठी ट्रोलही करण्यात आलेलं. अशातच आता तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.
गौरव खन्नाच्या बायकोची प्रतिक्रिया
आकांक्षाने यावेळी त्यांचे काही जुने फोटो शेअर केल्याचं पाहायला मिळतं. यावेळी तिने गौरवबरोबरचे विविध ठिकाणाचे फोटो शेअर करत त्याला “जसं की तुला माहीत आहे मी फार क्वचित कोणाची तरी आठवण काढत असते, पण आज मला तुझी आठवण येत आहे, तुझीच भुकी प्यासी”, अशी कॅप्शन दिली आहे. गौरवची बायको आकांक्षा अभिनेत्री असून तिने टेलिव्हिजनवर काम केलं आहे. आकांक्षाने ‘स्वरागिनी’, ‘भुतू’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे.

गौरव व आकांक्षा यांच्या प्रेमकहाणीबद्दल बोलायचं झालं तर त्यांची प्रेमकहाणी खूपच हटके आहे. ‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार गौरव व आकांक्षा यांची पहिली भेट ऑडिशनदरम्यान झालेली. काही काळ डेट केल्यानंतर त्यांनी २४ नोव्हेंबर २०१६ मध्ये कानपूर येथे लग्नगाठ बांधली.