Bigg Boss 19 Fame Neelam Giri Talk About Divorce : ‘बिग बॉस १९’मध्ये सहभागी झालेली अभिनेत्री नीलम गिरी घरात तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसं बोलताना दिसत नाही. मात्र नुकत्याच एका संवादात, तिने तिच्या वैवाहिक आयुष्याचा आणि घटस्फोटाचा उल्लेख केला.

बिग बॉसच्या घरातली तिची खास मैत्रीण आणि सहस्पर्धक तान्या मित्तलनं नीलमला दिवाळी कशी साजरी करतेस? असं विचारलं. त्यावर नीलमने दिवाळी कुटुंबाबरोबर साजरी करत असल्याचं सांगितलं. यावेळी कुटुंबाबद्दल बोलताना तिनं स्वत:च्या वैवाहिक आयुष्याबद्दलही सांगितलं. तान्याबरोबरच्या संवादात नीलमनं घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.

नीलम म्हणाली, “त्या नात्यात एकही क्षण असा नव्हता; ज्यावेळी मी आनंदी होते. आमचं वेगळं होणं हे माझ्या संमतीनं झालं खरं, पण तो काळ खूप वेदनादायक होता. त्या व्यक्तीशी लग्न करणं ही माझी मोठी चूक होती… आणि आजही त्या गोष्टीचा विचार डोक्यात आला की, माझं मन व्यथित होतं.” तिने असंही सांगितलं की, या कठीण अनुभवातून सावरत तिने स्वतःच्या आयुष्याला एक नवी दिशा दिली.

याआधी, मालतीशी झालेल्या संवादात, नीलमने तिच्या कुटुंबाच्या आर्थिक अडचणींबद्दल सांगितलं होतं. “लहानपणी वडील घर चालवण्यासाठी लाकूड तोडायचे. दोन वेळचं जेवण मिळावं म्हणून त्यांनी खूप कष्ट केले” असं नीलमनं भावुक होतं सांगितलं होतं.

बिग बॉसच्या घरात आल्यापासूनच नीलम आपल्या कुटुंबियांबाबतीत खूप भावनिक असल्याचं पाहायला मिळत आहे. ती अनेकदा घरातील सदस्यांकडे घरची आठवण व्यक्त करताना दिसली आहे. अशातच नुकत्याच झालेल्या भागात घरातून एक खास पत्र आलं होतं. मात्र फरहाना भट्टनं हे पत्र फाडून टाकलं. बिग बॉसने दिलेल्या या टास्कमध्ये फरहानानं नीलमसाठी आलेलं पत्र तिला वाचायला दिलं नाही. यामुळे नीलमला अश्रू अनावर झाले होते. याबद्दल तिनं फरहानाला जाबही विचारला.

नीलम गिरी इन्स्टाग्राम पोस्ट

दरम्यान, या आठवड्यात नीलम गिरी इतर तीन स्पर्धकांसह नॉमिनेशनमध्ये आहे. मात्र दिवाळीचा आठवडा असल्यामुळे या आठवड्यात कुणीही घराबाहेर जाणार नाही, असं काही वृत्तांमधून समोर येत आहे. त्यामुळे नीलम याही आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेपासून वाचली आहे.