Bigg Boss 19 Updates : टीव्हीवरील लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस.’ गेल्या महिन्यात ‘बिग बॉस’चं १९ वं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून या शोला आता हळूहळू रंगत चढू लागली आहे. शोमध्ये आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी स्पर्धकांमध्ये चांगलीच लढाई होतानाचे दिसत आहे. अशातच आता नॉमिनेशनबद्दल एक अपडेट समोर आली आहे.
‘बिग बॉस १९’ च्या ‘वीकेंड का वार’च्या भागात या आठवड्यातील नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांबद्दलची माहिती समोर आली आहे. या आठवड्यात ‘बिग बॉस १९’मधून बेघर होण्यासाठी अमाल मलिक, अशनूर कौर, नेहल चूडासमा, प्रणीत मोरे, मृदुल तिवारी आणि अभिनेत्री कुनिका सदानंद हे ६ स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत.
या आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धकांमध्ये टास्कवरून चांगलीच जुंपली होती. एकमेकांवर अनेक वैयक्तिक टीकासुद्धा करण्यात आली. या सगळ्याचा समाचार सलमान आजच्या ‘वीकेंड का वार’मध्ये घेणार आहे. समोर आलेल्या काही प्रोमोमधून अमाल मलिक आणि अशनूर कौर यांच्यातील वादावर सलमानने तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली.
अमालने अशनूरबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर सलमानने त्याला चांगलेच फटकारले. याशिवाय, सलमानने कुनिका सदानंदला वादाची मूळ म्हणूनही संबोधले. यामुळे घरात आणखी तणाव निर्माण झाला.
तसंच गेल्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यातसुद्धा प्रणीत आणि बसीर यांच्यात टोकाचे वाद झाले. या वादात बसीरने प्रणीतला तुला या घरातून बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला होता. यावर प्रणीतने ‘हा संपूर्ण महाराष्ट्रच माझं घर आहे’, असं उत्तर दिलं होतं.
त्यामुळे या आठवड्यात घरातील वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. आता या आठवड्यात कोण घरातून बाहेर जाणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मात्र, ‘बिग बॉस ताजा खबर’ या पेजनुसार, या आठवड्यात कोणीही घराबाहेर जाणार नसल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे सर्व नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांना घरात आपलं स्थान पक्कं करण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे.
आळमान खान शो ‘बिग बॉस १९’ प्रोमो
घरातून कोणी बाहेर जाणार नसल्याच्या वृत्ताबरोबरच या घरात एका नव्या स्पर्धकाची म्हणजेच वाइल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे. यावर अद्याप ‘बिग बॉस’कडून कसलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ‘बिग बॉस १९’मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून क्रिकेटर दीपक चहरची बहीण मालती येणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र हे वृत्त खरं की खोटं, यावर ‘बिग बॉसच्या शनिवार आणि रविवारच्या भागात शिक्कामोर्तब होईल.