Bigg Boss 19 Malti Chahar Talk About Her Father : टीव्हीवरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’ आणि या ‘बिग बॉस’ शोचं सध्या १९ वं पर्व सुरू आहे. शोमध्ये नुकत्याच एका वाइल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री झाली आहे. क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण मालती चहर ‘बिग बॉस १९’मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे.

नुकतीच एन्ट्री केलेल्या मालतीने घरातील तिचा खेळ दाखवायला सुरुवात केली आहे. तसंच ती हळूहळू इतर स्पर्धकांबरोबरही रमू लागली आहे. अशातच घरातल्या इतर स्पर्धकांशी गप्पा मारताना तिने आपल्या आयुष्यातील काही खास आठवणी शेअर केल्या.

नुकत्याच झालेल्या एका भागात सांगितलं, “मी IPS अधिकारी व्हावी, अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. त्यामुळे इतर मुली आपल्या वयात ज्या गोष्टी करतात, त्या गोष्टी करण्याची मला परवानगी नव्हती.”

अमाल मलिक आणि मृदुल तिवारीशी बोलताना मालतीनं सांगितलं, “माझ्या जन्माआधीच वडिलांचं स्वप्न होतं की, त्यांना एक मुलगी व्हावी आणि ती IPS अधिकारी व्हावी. त्यामुळे त्यांनी खूप प्रयत्न केले. मला घराबाहेर जाण्याचीही परवानगी नव्हती. बारावीपर्यंत माझ्या केसांचा बॉयकट होता. मला मुलींसारखे कपडे घालण्याचीही परवानगी नव्हती. मी मेंहंदी लावली असती, तर वडिलांनी मला मारलंच असतं. मला मुलींसारखं वागता येत नव्हतं.”

पुढे ती म्हणाली, “लहानपणापासून मी मुलांच्या संगतीत अधिक राहिली आहे. मी कायम वडिलांबरोबर आणि त्यांच्या मित्रांबरोबरच राहायचे. त्यामुळे पुरुष किंवा मुलांबरोबर राहायला मला कुठलाच संकोच वाटत नाही. त्यांच्याबरोबर असले की, खूप सहजपणा आणि आपलेपणा जाणवतो.”

मालती क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण म्हणूनही प्रसिद्ध आहे. तर, क्रिकेटपटू राहुल चहर तिचा चुलतभाऊ आहे. मालती २०१४ च्या फेमिना मिस इंडियामध्ये अंतिम फेरीत पोहोचली होती आणि ‘फेमिना मिस इंडिया दिल्ली २०१४’मध्ये तिने ‘मिस फोटोजेनिक’ हा किताबही जिंकला. तसेच ती अभिनेत्री आहे. २०१८ मध्ये आलेल्या ‘जिनियस’ या बॉलीवूड ती सिनेमात दिसली होती आणि ती मॉडेलिंग क्षेत्रातही कार्यरत आहे.