‘बिग बॉस’ हिंदीचं १६वं पर्व सध्या फारच गाजतंय. या घरात रोज काही ना काही वाद होत असतात. या वादात रागाच्या भरात केल्या गेलेल्या वक्तव्यांमुळे अनेक स्पर्धक चर्चेचा विषय ठरतात. नुकतच शालीन भानोत याने गौतम विजचा महिला म्हणून उल्लेख केला. यावर ‘बिग बॉस ७’ची विजेती गौहर खान हिने नाराजी व्यक्त करत शालिनला खडे बोल सुनावले आहेत.

नुकत्याच झालेल्या कॅप्टनसीच्या टास्कमध्ये शालीनने गौतमला महिला म्हटलं. इतकंच नाही तर तो महिला आहे म्हणून तो कमजोर आहे आणि त्याचमुळे तो टास्क नीट खेळू शकत नाही असं शालीन म्हणाला. शालीनच्या या वक्तव्यावर गौहर खान प्रचंड संतापली आहे. तिने ट्वीट करत शालीनच्या या वक्तव्याचा निषेध केला. तसंच तिने शालीनची कानउघडणी केली.

आणखी वाचा : दीपिका पाठोपाठ अनुष्का शर्मानेही घेतली अंतरराष्ट्रीय झेप, ‘या’ नावाजलेल्या अमेरिकन ब्रँडची झाली अॅम्बेसिडर

ट्वीटमध्ये ती म्हणाली, “शालीन, महिला कमजोर नसतात. गौतमला हे बोलताना तू याचा आधी विचार करायला हवा होतास. हे अपमानकारक आहे, निराशाजनक आहे. टीका करायची तर व्यक्तिमत्त्वावर कर, त्याच्या सवयींवर कर. महिला कमजोर नसते हे तुला तुझ्या जन्माच्या वेळेस कळायला हवं होतं. तुझी आई सुद्धा एक महिला आहे. थोडा तरी आदर दाखव.”

हेही वाचा : “आज तिने मान पकडलीय, उद्या ती…” शिव ठाकरेची बहिण संतापली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौहर खानने केलेला या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया देत तिचं म्हणणं बरोबर असल्याचे सांगितलं आहे. सध्या शालीन त्याच्या या वक्तव्यामुळे प्रेक्षकांच्या मनातून उतरला आहे. ही पहिलीच वेळ नाही यापूर्वीही शालीनने आक्षेपार्ह वक्तव्यं केली आहेत. यापूर्वी त्याने केलेल्या विधानांवरून सलमानने अनेकदा त्याची शाळा घेतली होती. त्यामुळे आता या वीकेंडच्या वार भागात सलमान याबद्दल काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.