‘बिग बॉस’च्या तिसऱ्या पर्वामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री सोनाली पाटील नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट, व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. नुकताच सोनालीने तृतीयपंथींबरोबरचा एक व्हिडीओ शेअर करून पोस्ट लिहिली आहे. तिच्या हा पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अभिनेत्री सोनाली पाटील सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावरील व्हायरल ट्रेंड फॉलो करत असते. तिचे शेतातील काम करताचे व्हिडीओ चांगलेच चर्चेत असतात. नुकताच तिने तृतीयपंथींना भेटल्यानंतरचा अनुभव चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. तिने त्यांच्याबरोबरचा एक व्हिडीओ शेअर करून लिहीलं, “श्रीकृष्णा तू अद्भुत कलाकृतींचा जनक आहेस हे मला आणि जगातील बुद्धिमान सजीवांना माहित आहे…तू एक ना अनेक अद्भुत कलाकृती निर्माण केल्या आहेस त्यामधे स्त्री, पुरुष आणि त्याच्या व्यतिरिक्त तिसरी व्यक्ती म्हणजे तृतीयपंथी, ही तूच तयार केली आहेस …पहिल्यापासूनच का कुणास ठाऊक या व्यक्तींचं मला आकर्षण आणि त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं असं मनामध्ये कुतूहल नेहमी असायचं आणि असतं. जेव्हा केव्हा त्या समोर येतात जशा त्यासमोर येतात तसं मी त्यांच्याकडे बघत राहते कारण तुझी कलाकृती इतकी सुंदर आहे, अद्भुत आहे, कदाचित त्यामुळे असेल…”

हेही वाचा – शाहरुख खानच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘डंकी’ का ठेवलं? अभिनेत्यानं स्वतः सांगितलं कारण, म्हणाला…

“आपल्या लेखी भाषेमध्ये त्यांना तृतीयपंथी, थर्ड जेंडर म्हणतात. त्यांच्यापासून मी कधीच पळाले नाही, घाबरले नाही. कदाचित म्हणूनच त्यांना पाहिल्यावर आणि त्यांनी मला पाहिल्यावर आम्ही बोललो, भेटलो आणि व्लॉगमध्ये देखील कॅप्चर ही केलं…ते आपला स्वीकार करतात ना मग चला तर आपण पण त्यांचे होऊ…बिग बॉस वाल्यांनो मला पुन्हा बिग बॉसच्या घरात घ्या अशी मागणी आलेली आहे. तेव्हा प्लीज मला लवकर बोलवा…” असं सोनालीने लिहीलं आहे. तसंच सोनालीने या भेटीचा व्लॉग तिच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे.

हेही वाचा – Amruta Khanvilkar Birthday: मुंबईचा जन्म पण वडिलांच्या ‘त्या’ निर्णयामुळे पुणेकर झाली अमृता खानविलकर, वाचा तिचा अभिनयसृष्टीतील प्रवास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सोनालीनं ‘बिग बॉस मराठी’ पूर्वी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘वैजू नंबर वन’ या लोकप्रिय मालिकेत काम केलं होतं. त्यानंतर ती ‘जुळता जुळता जुळतंय की’, ‘देवमाणूस’ यांसारख्या मालिकामध्ये झळकली होती. एवढंच नाहीतर सोनालीनं हिंदी मालिकेतही काम केलं. ‘वागले की दुनिया’ या हिंदी मालिकेत ती दिसली होती.