‘बिग बॉस’मुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या शिव ठाकरेच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गर्लफ्रेंड वीणा जगतापनंतर ‘बिग बॉस’च्या घरात शिव ठाकरेचं नाव निमृत कौर अहुवालियाबरोबर जोडलं गेलं होतं. त्यानंतर आता शिव प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा पुरीला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. अनेक कार्यक्रमांदरम्यान शिव व आकांक्षाला स्पॉट केलं गेल्यामुळे या चर्चा रंगल्या आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या शिव ठाकरेबरोबरच्या डेटिंगच्या चर्चांवर अखेर आकांक्षा पुरीने मौन सोडलं आहे. आकांक्षाने इंडियन फोरम्सला दिलेल्या मुलाखतीत याबाबत भाष्य केलं. शिव ठाकरेबरोबरच्या डेटिंगच्या चर्चांमध्ये कोणंतही तथ्य नसल्याचं तिने म्हटलं आहे. याबरोबरच आकांक्षाने शिव ठाकरेचं कौतुकही केलं आहे.

हेही वाचा>> GT vs MI सामन्यात अर्जुन तेंडुलकर-शुबमन गिल आमने सामने, सारा तेंडुलकरवरील ‘किसी का भाई किसी की जान’ मीम्स व्हायरल

“शिव ठाकरेबरोबरच्या डेटिंगच्या चर्चा या केवळ अफवा आहेत. शिव ठाकरे एक चांगला मुलगा आहे. तो खूप प्रेमळ आहे. स्वीटहार्ट आहे. पण, माझ्या नशिबात चांगले लोक नाहीत,” असं म्हणत आकांक्षाने शिव ठाकरेबरोबरच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

हेही वाचा>> मुख्यमंत्र्यांच्या लेकाशी लग्न, वर्षभरातच पतीचं निधन अन्…; किशोर कुमार यांच्याशी दुसऱ्यांदा विवाह करताना सात महिन्यांची गरोदर होती प्रसिद्ध अभिनेत्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोण आहे आकांक्षा पुरी?

आकांक्षा पुरी एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने हिंदी, तमिळ, मल्याळम व कन्नड चित्रपटांत काम केलं आहे. बॉलिवूड गायक मिका सिंगच्या स्वयंवरमध्ये ती सहभागी झाली होती. या स्वयंवरात मिकाने आकांक्षा पुरीला आपली वधू म्हणून निवडले होते. पण काही कारणांमुळे त्यांनी लग्न केलं नाही.