‘बिग बॉस’ हा लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. हा शो फक्त हिंदीच नाही तर अनेक दाक्षिणात्य भाषांमध्येही सुरू आहे. सध्या बिग बॉस कन्नडचे १० वे पर्व सुरू आहे. या पर्वातील स्पर्धक वरथूर संतोषला रविवारी अटक करण्यात आली आहे. बिग बॉस या रिअॅलिटी शोचे २४ तास रेकॉर्डिंग होत असते. या घरात त्याने वाघाच्या नखांचे पेंडंट गळ्यात घातले होते. त्याने स्वतःच याबाबत भाष्य केल्याचं आढळलं. याप्रकरणी वनविभागाकडे तक्रार आल्यानंतर संतोषला अटक करण्यात आली.

आयरा खानच्या सासूबाईंना पाहिलंत का? आमिर खानने केलं मराठमोळ्या विहीणबाईंचं कौतुक; म्हणाला, “प्रीतमजी…”

बंगळुरूचे शहरी उपवनसंरक्षक एन रवींद्रकुमार यांनी वरथूर संतोषच्या अटकेची पुष्टी केली आहे. “माहिती मिळाल्यानंतर आम्ही शूटिंग सुरू असलेल्या ठिकाणी गेलो. आम्ही कर्मचार्‍यांना संतोषला बाहेर पाठवण्यास सांगितले आणि आम्ही त्याचे पेंडंट तपासले तेव्हा ती वाघांची नखं असल्याचं आढळलं, त्यानंतर आम्ही त्याला ताब्यात घेतले,” असं रवींद्रकुमार यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला सांगितलं.

“विकीने मला विकले अन्…” अंकिता जैन बिग बॉसमध्ये पतीबद्दल असं का म्हणाली? जाणून घ्या

एका वन अधिकाऱ्याने सांगितले की त्यांनी संतोषला वाघाच्या नखांबद्दल विचारलं असता तो म्हणाला की त्याला त्याच्या पूर्वजांकडून तू पेंडंट मिळाले आहे. मात्र, वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ अंतर्गत, प्राण्यांचे कोणतेही अवयव परिधान करणे किंवा प्रदर्शित करणे हा दंडनीय गुन्हा आहे, असं अधिकाऱ्याने नमूद केलं.

संतोष बंगळुरूच्या वरथूरमध्ये गायी विकण्याचा व्यवसाय करत असून तो रिअल इस्टेट व्यवसायातही करतो. त्याचे काही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो सोशल मीडियावर हिट झाला आणि यामुळे त्याला बिग बॉसमध्ये प्रवेश करण्यासाठी ऑफर देण्यात आली. पण बिग बॉसच्या घरात तो त्याच्या वाघ नखांच्या पेंडंटमुळे अडचणीत आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, वायकॉम १८ च्या प्रवक्त्याला वरथूर संतोषच्या अटकेबद्दल विचारण्यात आलं, पण त्याने या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला.