‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाला प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे. अतिशय वादग्रस्त असलेला हा शो घराघरात तितक्याच आवडीने पाहिला जातो. या घरात बेस्टफ्रेण्डदेखील अनेकदा एकमेकांशी शत्रूप्रमाणे वागतात. ‘बिग बॉस’च्या घरात अमृता धोंगडे आणि तेजस्विनी लोणार यांच्यातही चांगली मैत्री झाली. परंतु, त्यांच्यात आता कडाक्याचं भांडण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

अमृता आणि तेजस्विनीमध्ये जेवणावरुन वाद निर्माण झाला आहे. ‘कलर्स मराठी’च्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन प्रदर्शित होणाऱ्या भागाचा प्रोमो व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अमृता-तेजस्विनी एकमेकींशी भांडताना दिसत आहेत. बेडरुममधून रागात बाहेर येऊन अमृता “तेजस्विनी तू आता काय करत आहेस?”, असं तिला विचारते. तेजस्विनी यावर उत्तर देत “तू जेवणावर राग काढत आहेस. ही पद्धत नाहीये”, असं म्हणते. यावर अमृता “हो हीच पद्धत आहे आता”, असं तिला उत्तर देते.

हेही वाचा >> आलिया लग्नाआधीच गरोदर होती? बहीण शालीन भट्ट म्हणते…

हेही पाहा >> Photos : अंकिताच्या पहिल्या करवा चौथचं जंगी सेलीब्रेशन; डिजे-डान्स, मराठी सेलिब्रिटींची हजेरी अन् पती विकीसाठी गायलं खास गाणं

पुढे व्हिडीओमध्ये गार्डन एरियामध्ये त्या बोलत असल्याचं दिसत आहे. तेजस्विनी अमृताला “अरेरावीची भाषा करू नको. असं बोललेलं मला चालणार नाही”, असं म्हणते. यावर उत्तर देत अमृता तिला “आधी तुझी भाषा बघ”, असं बोलून तिथून निघून जाते. नंतर अमृता बेडरुममध्ये येऊन “सगळ्यांचीच मनधरणी करायला मी इथे आले आहे”, असं रडत म्हणत असते.

हेही वाचा >> शिल्पा शेट्टीच्या चाळणीने चेहरा लपवल्यामुळे राज कुंद्रा ट्रोल, नेटकरी म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बिग बॉस’च्या घरात आता या मैत्रिणीमध्ये पुढे काय होणार? भांडण मिटवून अमृता आणि तेजस्विनी पुन्हा एकत्र येणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे. नुकतंच ‘बिग बॉस’च्या घरातील दुसऱ्या आठवड्यासाठीच्या कॅप्टन्सी पदासाठी टास्क खेळवण्यात आला. यात अक्षय केळकर आणि रोहित शिंदे यांच्या टीममध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या टास्कमध्ये विजय मिळवत रोहित शिंदे ‘बिग बॉस’च्या घरातील नवा कॅप्टन बनला आहे.