‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी अजूनही हा शो चर्चेत आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी आणि यंदाच्या पर्वात घरात सर्वाधिक चर्चेत राहिलेली अपूर्वा नेमळेकर या पर्वाची रनर अप ठरली.

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच ‘ईटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अपूर्वाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत भाष्य केलं आहे. “मी ज्याप्रकारे हा खेळ खेळले, त्याचा मला आनंद आहे. माझा खेळ स्ट्रॉंग व चांगला होता. घरातील इतर सदस्यांसाठी मी स्ट्रॉंग स्पर्धक होते. त्यांच्याशी मी उत्तम स्पर्धा करू शकले, याचा मला अभिमान आहे”, असं अपूर्वा म्हणाली.  

हेही वाचा>> अपूर्वा नेमळेकरचं महेश मांजरेकरांबाबत धक्कादायक विधान, म्हणाली “त्यांच्यामुळे…”

हेही पाहा>> Photos: खणाचा ड्रेस अन् हलव्याचे दागिने, मकर संक्रांतीसाठी ‘परी’चा खास लूक

पुढे भूतकाळ व वैयक्तिक आयुष्याबाबत अपूर्वा म्हणाली, “मी भूतकाळात कठीण काळातून गेले आहे. परंतु, त्यामुळे मी स्ट्रॉंग बनले. सगळ्या परिस्थितीशी मी लढा दिला. भूतकाळात घडलेल्या अनेक गोष्टींचा मला आजही त्रास होतो. अजूनही मी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत किंवा भूतकाळात घडलेल्या गोष्टी मी कधीच सोशल मीडिया व घरातही व्यक्त केल्या नाहीत, याबद्दल मला आनंद आहे. मी प्रामाणिकपणे माझा खेळ खेळले”.

हेही वाचा>> रणदीप हुड्डाला घोडेस्वारी करताना दुखापत; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपूर्वाने अनेक मालिका व नाटकांत काम केलं आहे. ‘आभास हा’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलेल्या अपूर्वाला ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील शेवंतामुळे खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. आता ‘बिग बॉस मराठी’मुळे तिच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे.