छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’कडे पाहिले जाते. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. गेल्या २ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व सुरु झाले आहे. यंदाचं पर्व हे ऑल इज वेल या थीमवर आधारित आहे. या पर्वाची जशी जोरदार सुरवात झाली तशी घरातून बाहेर पडणाऱ्या स्पर्धकांची चर्चा होत आहे. नुकतीच रुचिरा जाधव बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे.

‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वात झळकणारी बोल्ड जोडी म्हणजे अभिनेत्री रुचिरा जाधव आणि तिचा बॉयफ्रेंड डॉ. रोहित शिंदे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून रुचिरा जाधवला ओळखले जाते. प्रसाद आणि रुचिरा डेंजर झोनमध्ये होते मात्र दोघांच्यापैकी रुचिराला बाहेर पडावे लागले. त्यामुळे साहजिकच तिचे चाहते नाराज झाले आहेत. तिचे चाहते सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. चाहते म्हणत आहेत ‘आता रोहितच कसं होणार?’

लोकप्रिय मालिका ‘राजा राणीची गं जोडी’ घेणार प्रेक्षकांचा निरोप! लेखक चिन्मय मांडलेकरची भावूक पोस्ट

या कार्यक्रमात सुरवातीला रुचिरा जाधव आणि अमृता धोंगडे एकमेकांच्या विरोधात उभ्या होत्या. मात्रनंतर या वादात अपूर्वा नेमळेकरने उडी घेतली होती. याआधी कार्यक्रमातून मेघा घाडगे, निखिल राजेशिर्के बाहेर पडले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Ruchira Jadhav (@ruchira_rj)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुचिरा घराबाहेर पडल्याने तिचा बॉयफ्रेंड डॉ. रोहित शिंदे भावूक झाला होता. त्याने महेश मांजरेकरांना विनंतीदेखील केली होती तिला बाहेर काढू नका. महेश मांजरेकरांनी त्याला समजावून सांगितले हे कार्यक्रमाच्या नियमांच्या विरोधात असल्याने असे करता येणार नाही. रुचिरा आणि रोहितमध्ये काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला होता. तिने घर सोडतानादेखील रोहितकडे दुर्लक्ष केलं. मात्र महेश मांजरेकरांच्या सांगण्यावरून तिने जाता जाता त्याला मिठी मारली.