Bigg Boss Marathi 5 व्या पर्वातील स्पर्धकांची सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चा रंगताना दिसते. घरात स्पर्धकांमध्ये झालेले भांडण, बिग बॉसने दिलेल्या टास्कमध्ये ते ज्या पद्धतीने गेम खेळतात तो गेम, तर कधी त्यांनी केलेले वक्तव्य यांमुळे हे स्पर्धक चर्चांचा भाग बनतात. गेल्या आठवड्यात वैभव चव्हाण बिग बॉसच्या घराबाहेर पडला. त्यानंतर आता धनंजय पोवारने त्याच्यासाठी केलेल्या वक्तव्यावर वैभवने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळत आहे.

काय म्हणाला धनंजय पोवार?

वैभव चव्हाणने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये धनंजय पोवार वैभवला उद्देशून बोलत असल्याचे पाहायला मिळते. धनंजय पोवार गार्डन परिसरात बसलेला असून वैभवला उद्देशून तो म्हणतो, “वैभव मित्रा, खरंच या घरामध्ये तू माझ्या मनात घर केलं आहेस. पण, पहिले चार आठवडे ज्या पद्धतीनं मी तुझ्याबद्दल तुझ्यापाठीमागं आमच्या ग्रुपमध्ये चर्चा व्हायची त्यामध्ये मी बोलायचो. बऱ्यापैकी जेवढ्या गोष्टी आठवतील तेवढ्या मी स्पष्ट केल्या आहेत.

“मी जे बोललो ते बोलण्याच्या पाठीमागे एक उद्देश होता. मनामध्ये तू माझ्याबद्दल कोणताही राग न ठेवता, तू माझ्याशी असलेलं मैत्रीचं नातं तसंच पुढे राहू द्यावंस. गेल्या तीन-चार आठवड्यांत मी तुझ्यासमोर व्यक्त झालो, त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा स्वार्थ नव्हता. पण, पहिल्या चार आठवड्यांत मी तुझ्याबद्दल जे बोललो त्यापाठीमागे हाच हेतू होता की, तू अरबाजविरुद्ध उभं राहावंस आणि आम्हाला तुझी मदत मिळावी, हिंमत मिळावी. बाकी तू खूप समंजस आहेस,” असे वैभवने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

धनंजय पोवारचा हा व्हिडीओ शेअर करीत वैभव चव्हाणने लिहिले, “भावा, मैत्रीत माफी वगैरे काही नसतं रे, त्यानिमित्तानं एक जवळचा मित्र तरी कमावला. काळजी करू नकोस. आम्ही तुझ्यासोबत आहोत.”

हेही वाचा: Video: सूरज चव्हाणला पाण गेंडा ओळखताना आले नाकीनऊ; सर्व सदस्यांना झालं हसू अनावर, पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बिग बॉसच्या मराठी ५ व्या पर्वात पहिल्याच आठवड्यात दोन गट पडले होते. टीम एमध्ये अरबाज पटेल, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर व वैभव चव्हाण होते. तर, टीम बीमध्ये अंकिता, धनंजय, अभिजीत, सूरज, आर्या, पंढरीनाथ हे स्पर्धक होते. त्याशिवाय वर्षा उसगांवकर स्वतंत्रपणे खेळत असल्याचे पाहायला मिळत आहे. घनश्याम टीम एमध्ये सामील झाला होता. मात्र, भाऊच्या धक्क्यावर निक्कीला तिच्या टीममधील सदस्य तिच्याविषयी तिच्यापाठीमागे काय बोलतात हे दाखवले. त्यानंतर त्यांच्यात भांडण होऊन टीममध्ये फूट पडल्याचे पाहायला मिळाले. आता धनंजय पोवारने स्वतंत्रपणे खेळणार असल्याचे म्हटले आहे. आता बिग बॉसच्या घरात येणाऱ्या काळात त्याचा खेळ कसा असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.