Bigg Boss Marathi Eliminated Aarya : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनच्या कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्याने निक्कीला कानशि‍लात लगावल्याची घटना घडली. यामुळे संपूर्ण घरात मोठा गोंधळ पाहायला मिळाला होता. यानंतर निक्कीने आरडाओरडा करून सगळं घर डोक्यावर घेतलं होतं. आर्याला प्राथमिक शिक्षा म्हणून ‘बिग बॉस’ने जेलमध्ये टाकलं. तसेच या प्रकरणाचा निकाल भाऊच्या धक्क्यावर घेण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं.

रितेश देशमुखने आर्याला भाऊच्या धक्क्यावर तिने घरात केलेल्या कृत्याचा जाब विचारला. यानंतर ‘बिग बॉस’ने त्यांची शिक्षा जाहीर केली. “आर्या आणि निक्कीमध्ये झालेलं भांडणं निंदनीय आहे. बाथरुम एरियामध्ये दोघींमध्ये धक्काबुक्की झाली. यात निक्कीचा आर्याला हात लागला आणि त्यानंतर आर्याचा संयम सुटला आणि तिने निक्कीच्या कानाखाली मारली. हा ‘बिग बॉस’च्या घरातील सर्वात मोठा नियमभंग आहे. त्यामुळे आर्याला या घरातून निष्कासित करण्यात येत आहे.” असं सांगण्यात आलं. आर्याने घराबाहेर गेल्यावर ‘टीम बी’ला अश्रू अनावर झाले होते. यावर आता विविध कलाकारांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – निक्कीला मारणं पडलं महागात, रितेशने सुनावलं अन् आर्याला बिग बॉसने दाखवला बाहेरचा रस्ता; म्हणाले, “अशा निंदनीय कृत्यांना…”

पुष्कर जोगने आर्याला दिला पाठिंबा

अभिनेता आणि ‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) पहिल्या पर्वाचा उपविजेता पुष्कर जोगने यासंदर्भात पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे. त्याने आपल्या पोस्टमधून आर्याला जाहीर पाठिंबा दिला आहे. अभिनेता म्हणाला, “मी आर्याच्या पाठिशी ठामपणे उभा आहे. ती चुकली मला मान्य आहे पण, निक्की ६ आठवडे जो त्रास देतेय, अमानुषपणे वागतेय त्याचं काय? तिचं वागणं अगदी भयानक आहे. निक्कीची भाषा विचित्र आहे. प्रत्येकाचा अनादर करत असते. त्यामुळे तिला पण शिक्षा झाली पाहिजे”

हेही वाचा : Video: “तुम्ही हा आठवडा गाजवला…”, रितेश देशमुखने पंढरीनाथ कांबळेच्या खेळाचं केलं कौतुक, म्हणाला, “अंगाला तेल लावून…”

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : आर्यासाठी पुष्कर जोगची पोस्ट

हेही वाचा : Bigg Boss Marathi तून बाहेर पडल्यावर आर्या जाधवची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “निक्कीला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आर्याला घराबाहेर काढल्याने सध्या तिचे चाहते ‘बिग बॉस’वर प्रचंड नाराज झाले आहेत. घराचा निरोप घेतल्यावर इन्स्टाग्रामवर हार्टब्रेक इमोजी शेअर करत आर्याने पहिली प्रतिक्रिया दिली होती. आता आर्या लवकरच लाइव्ह येऊन तिचं मत मांडणार आहे. ती या सगळ्या प्रकरणावर नेमकं काय बोलणार याकडे तिच्या तमाम चाहत्यांचं आणि ‘बिग बॉस मराठी’च्या प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.