Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा आठवडा सध्या दणक्यात सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. यंदा घरात मानकाप्याची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे नियमानुसार घरातील कोणताही सदस्य एकटा फिरू शकत नाही. ‘बिग बॉस’कडून अभिजीत-निक्की, आर्या-अरबाज, वर्षा-अंकिता अशा एकूण ६ जोड्या जुळवण्यात आल्या आहेत. ‘बिग बॉस’ने या अनोख्या जोड्या तयार केल्याने सध्या घरातील सदस्यांमध्ये असलेली मैत्री आणि एक महिन्यापासून त्यांनी आपआपसांत बनवलेले ग्रुप आता फुटल्याचं पाहायला मिळत आहे.

निक्की-अभिजीतची मैत्री गेल्या काही दिवसांपासून अरबाजला खटकत आहे. यामुळे मंगळवारच्या ( २७ ऑगस्ट ) भागात घरात मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. अरबाजने निक्की नीट वागत नसल्याचं कारण देत किचनजवळ भांडी फोडली. एवढंच नव्हे तर बेडरुममध्ये जाऊन त्याने आदळआपट केल्याचं पाहायला मिळालं. अरबाजचं हे आक्रमक रुप पाहून घरातल्या प्रत्येकाने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. शेवटी ‘बिग बॉस’ने अरबाजला शिक्षा देत त्याची कॅप्टन्सी काढून घेतली आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “हा शो निक्की-अरबाजच्या लव्हस्टोरीचा नाही…”, पुष्कर जोग संतापला; पोस्ट शेअर करत थेट ‘बिग बॉस’ला केली विनंती

सध्या संपूर्ण घर निक्कीच्या विरोधात आहे. अशातच या आठवड्यात ‘बिग बॉस’ने निक्कीचा जोडीदार म्हणून अभिजीतची निवड केल्याने त्यालाही या सगळ्याचा फटका बसत आहे. सध्या अभिजीत टीम ‘बी’ सोडून निक्कबरोबर गप्पा मारत असल्याचं पाहायला मिळतं शिवाया नॉमिनेशन टास्क झाल्यावर निक्कीने त्याला गेम देखील समजून सांगितला होता. आता हीच मैत्री गायकाला भारी पडणार आहे. कारण, येत्या भागाच्या नव्या प्रोमोमध्ये अभिजीतशी त्याची मित्रमंडळी भांडत असल्याचं दिसतंय.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

हेही वाचा : “बायको म्हणून…”, शिवानी सुर्वेच्या वाढदिवसानिमित्त नवऱ्याची रोमँटिक पोस्ट! अभिनेत्री कमेंट करत म्हणते, “अहो…”

Bigg Boss Marathi : घरात नेमकं काय घडलं?

‘कलर्स वाहिनी’ने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये अभिजीतला घन:श्याम, सूरज, पंढरीनाथ, वर्षा, जान्हवी, अरबाज असे सगळे मिळून नियम मोडू नकोस असं सांगत आहेत. यावेळी घन:श्याम सांगतो, “तुम्ही जोडीशिवाय घरात फिरू शकत नाही.” यावर अभिजीत “मला बिग बॉस सांगतील मी बघतो” असं स्पष्ट सांगतो. एवढ्यात आर्या त्याला म्हणते, “तुम्ही तुमचे शब्द बोलताय की निक्कीचे बोलताय? दोन दिवसांत अभिजीत सावंत चेंज”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिजीत घडलेला संपूर्ण प्रकार निक्कीला सांगतो ती बाथरुममध्ये त्याला सांगते, “मी ओळखते तुला चार दिवस झाले… आणि हे लोक तुला ओळखू शकले नाहीत.” या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांनी निक्की अभिजीतचा खेळ बिघडवतेय असं म्हटलंय तर, काही नेटकऱ्यांनी निक्की-अभिजीत एकटे संपूर्ण घराशी लढत असल्याने त्यांचं कौतुक केलं आहे.