Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झालेली आहे. पहिल्या दिवसापासूनच घरात सहभागी झालेले १६ स्पर्धक एकमेकांशी वाद घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावर आता सर्व स्तरांतून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विशेषत: हिंदी ‘बिग बॉस’ गाजवून आलेल्या निक्की तांबोळीचे वर्षा उसगांवकर, आर्या जाधव, अंकिता वालावलकर यांच्याशी टोकाचे वाद झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक मराठी कलाकारांनी या वादासंदर्भात पोस्ट शेअर करत निक्कीला खडेबोल सुनावले आहेत.

निक्की तांबोळीने वर्षा उसगांवकरांशी वाद घालताना चुकीच्या भाषेचा वापर केल्यामुळे अनेक मराठी कलाकार तिच्यावर संतापले आहेत. काही दिवसांपूर्वीच “निक्की तुला मॅनर्स कळतात का?” अशा आशयाची पोस्ट अभिनेता पुष्कर जोगने केली होती. आता या प्रकरणावर ‘बिग बॉस’च्या आधीच्या पर्वात सहभागी झालेला अभिनेता जय दुधाणेने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : “Be Strong माई”, वर्षा उसगांवकरांच्या ऑनस्क्रीन लेकाची पोस्ट चर्चेत! म्हणाला, “रितेश भाऊ बरोबर क्लास…”

जय दुधाणेची पोस्ट चर्चेत

जय दुधाणे लिहितो, “निक्की तांबोळी ही ‘बिग बॉस मराठी’ मधली सर्वात वाईट स्पर्धक आहे. या सगळ्यात मी अभिजीत सावंतचं नक्कीच कौतुक करेन कारण, जान्हवी कशी तिच्या ( निक्की ) हातातलं ‘बुगू बुगू’ झालीये हे त्याने सांगितलं आणि ती महाराष्ट्राच्या सुपरस्टार अभिनेत्री वर्षा उसगांवकरांशी कसं वागली हे आपण सर्वांनी पाहिलं. अतिशय चुकीचं वागून निक्कीने त्यांचा अनादर केला.”

हेही वाचा : Bigg Boss Marathi : वर्षा उसगांवकर-निक्की तांबोळीच्या वादावर किशोरी शहाणेंनी मांडलं स्पष्टच मत, कोणाची बाजू घेतली? जाणून घ्या…

“आम्ही सुद्धा आमच्या सीझनमध्ये भांडायचो. खूप भांडणं व्हायची. पण, मला आजही आठवतंय आम्ही कधीच आमच्या सीझनमध्ये सहभागी झालेल्या ज्येष्ठ कलाकारांचा अनादर केला नाही. त्यांच्याशी सगळे व्यवस्थित वागायचे.” असं जयने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

jay post on nikki tamboli
जय दुधाणेची पोस्ट

हेही वाचा : Bigg Boss Marathi 5 : अंकिता प्रभू वालावलकरला घरातील ‘हे’ काम करायची वाटते भीती; रडत केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
jay dudhane post on nikki tamboli
जय दुधाणेची पोस्ट

दरम्यान, जय दुधाणे ‘ Bigg Boss मराठी’च्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाला होता. त्याने या शोमध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. ‘Bigg Boss ३’ चा जय उपविजेता होता. त्याच्या सीझनमध्ये विशाल निकमने ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. याशिवाय जयने ‘Splitsvilla 13’ हा शो अदिती राजपूतसह जिंकला आहे. काही दिवसांपूर्वीच जय ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत झळकला होता. ही मालिका त्याने नुकतीच सोडली.