Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व दणक्यात सुरू झालं आहे. पहिल्याच दिवसांपासून सदस्यांमध्ये वादाची ठिणगी पेटली आहे. निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर (Nikki Tamboli and Varsha Usgaonkar) यांच्यातील वाद तर थांबायचं नावाचं घेत नाहीये. दोघींमध्ये सतत वाद होताना दिसत आहेत. ३० जुलैच्या भागात निक्की तांबोळी वर्षा उसगांवकरांचा अपमान करताना दिसली. बेड संबंधित नियम उल्लंघन केल्यामुळे संपूर्ण आठवडा बेडशिवाय सदस्यांना झोपण्याची शिक्षा बिग बॉसने दिली. यावेळी निक्कीचा पार चढला आणि तिनं वर्षा उसगांवकरांमुळेच ही शिक्षा घरातील सदस्यांना झाल्याचा आरोप केला.

“तुमच्या एका चुकीमुळे आम्हाला त्रास भोगावा लागत आहेत. तुम्ही बेडवर तंगड्यावर वर करून झोपला होता. तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती,” अशा भाषेत बोलून निक्कीनं वर्षा उसगांवकरांचा अपमान केला. यादरम्यान वर्षा ताईंनी ‘बिग बॉस’ची माफी मागितली आणि इतर सदस्यांकडूनही बेड संबंधित नियम उल्लंघन झाल्याचं सांगितलं. पण निक्की काही ऐकत नव्हती. निक्कीने वर्षा उसगांवकरांचा केलेला हा अपमान पाहून लोकप्रिय गंगा म्हणजेच अभिनेत्री प्रणित हाटेने सोशल मीडियावर संतप्त पोस्ट शेअर केली आहे.

Madalsa Sharma quits Anupamaa
मिथुन चक्रवर्तींच्या सूनेने सोडली लोकप्रिय मालिका; म्हणाली, “माझे पती अन् सासरे…”
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
chhichhore movie has 5 years complete shraddha kapoor share her memories on social media
‘छिछोरे’ सिनेमाला पाच वर्षे पूर्ण! सुशांतबरोबरच्या ‘त्या’ व्हिडीओद्वारे श्रद्धा कपूरचा जुन्या आठवणींना उजाळा, म्हणाली…
Director Called Me Daughter and Raped said Actress
Kerala Actress : “दिग्दर्शक मला म्हणायचा तू मुलीसारखी आहेस, त्याने वर्षभर बलात्कार केला आणि..”, अभिनेत्रीची आपबिती
kangana Ranaut is disappointed after the film Emergency did not get Censor Board certification
हतोत्साहित करणारे, अन्यायकारक! ‘इमर्जन्सी’ला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे कंगना राणावत निराश
shraddha kapoor new house set become akshay kumar neighbour in juhu on rent
कोट्यवधींची मालकीण असून श्रद्धा कपूर राहणार भाड्याने; जुहूमध्ये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या शेजारी घेणार फ्लॅट
Mandar Chandwadkar left dubai job for acting
अभिनयासाठी सोडली दुबईतील नोकरी, ८ वर्षे संघर्ष केल्यावर मिळाला शो; १६ वर्षांपासून मराठमोळा अभिनेता करतोय प्रेक्षकांचे मनोरंजन
What does the Hema committee report say about the casting couch in Malayalam cinema
मल्याळी चित्रपटसृष्टीतही ‘कास्टिंग काऊच’? काय सांगतो न्या. हेमा समिती अहवाल?

“निक्की तांबोळी ज्याप्रकारे वर्षा उसगांवकर मॅडमशी वागत आहे, हे अत्यंत लज्जास्पद आहे. आपल्या ज्येष्ठ कलाकारांशी कसं बोलावं हे समजून घेणं तिनं गरजेचं आहे. त्यामुळे रितेश देशमुखने योग्य भूमिका घेऊन वर्षा उसगांवकरांच्या पाठिशी उभं राहायला पाहिजे”, असं कॅप्शन लिहित प्रणित हाटेने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत प्रणित भडकलेली पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – ‘हा’ कोणत्या लोकप्रिय मालिकेचा फोटो आहे? ओळखा पाहू, १० वर्षांपूर्वी झाली होती सुपरहिट

व्हिडीओत प्रणित म्हणाली, “सगळ्यांना हाय हॅलो, नुकत्याच ‘बिग बॉस मराठी’च्या भागात निक्की तांबोळी ज्या पद्धतीने वर्षा उसगांवकर यांच्याशी बोलत आहे, ते अत्यंत भयानक आहे. ती निक्की जी कोणीही असेल. पण आपल्या ज्येष्ठ कलाकारांशी कसं वागावं, बोलावं याची एक समज असते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा अख्ख्या भागात तुम्ही पाहिलं असेल की, फक्त वर्षा उसगांवकरच बेडवर बसल्या नव्हत्या. इतर सदस्य देखील बेडवर बसले होते. गार्डन एअरच्या बेडवरही बसले होते.”

Bigg Boss Marathi (Photo Credit - Colors Marathi)
Bigg Boss Marathi (Photo Credit – Colors Marathi)

पुढे प्रणित म्हणाली, “तिसरा मुद्दा, तंगड्या वर करून झोपते कॅमेरासमोर…हे किती विचित्र वाक्य आहे आणि किती अपमानित आहे. आता बघायचं आहे की, रितेश देशमुखची यावर प्रतिक्रिया काय असते. कारण ‘बिग बॉस’च्या घरात ज्येष्ठ कलाकारांना असं रडताना, अपमानित करताना बघून खूप वाईट वाटतं. कोणीतरी निक्कीला बोललं पाहिजे होतं. वर्षा उसगांवकर यांच्याबरोबर उभं राहायला पाहिजे होतं. पण एकामध्येही हिंमत नव्हती पुढे येऊन बोलायची की, तू चुकीची आहेस. त्यामुळे आता रितेश देशमुख यावर कसा रिअ‍ॅक्ट होतोय हे पाहणं महत्त्वाचं आहे.”

हेही वाचा – Bigg Boss च्या घरात पहिलं नॉमिनेशन! निक्की-अंकिताची एकमेकींना धक्काबुक्की, पाहा जबरदस्त प्रोमो

आज होणार पहिलं नॉमिनेशन

दरम्यान, आज ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पहिलं नॉमिनेशन पार पडणार आहे. यावेळी देखील निक्की व वर्षा उसगांवकर यांच्यामधील शाब्दिक वाद पाहायला मिळणार आहे. पण पहिल्याच आठवड्यात कोण-कोण घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट होणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.