‘बिग बॉस मराठी’ फेम, ‘पुण्याची टॉकरवडी’ अशी ओळख असणारी अभिनेत्री अमृता देशमुख नुकतीच विवाहबंधनात अडकली. तिने अभिनेता प्रसाद जवादेबरोबर लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. अमृता आणि प्रसाद या दोघांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. यावेळी प्रसादने अमृतासाठी खास उखाणाही घेतला.

प्रसाद आणि अमृताने लग्नात सप्तपदी घेताना खास मराठमोळा लूक केला होता. अमृताने गुलाबी रंगाची भरजरी साडी, नाकात नथ, गळ्यात दागिने, कपाळी चंद्रकोर असा खास लूक केला होता. यावेळी प्रसादने बायकोला साजेसं असं पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पितांबर नेसलं होतं.त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.
आणखी वाचा : शुभमंगल सावधान! अमृता देशमुख-प्रसाद जवादेच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो

आता नुकताच अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांच्या लग्नातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते दोघेही एकमेकांसाठी खास उखाणा घेताना दिसत आहेत. यावेळी प्रसादने अमृतासाठी स्पेशल आणि हटके उखाणा घेतला.

आणखी वाचा : “बहिणीची काळजी घे…”, अभिषेक देशमुखने कानपिळीदरम्यान प्रसादला बजावले, उत्तर देताना अभिनेता म्हणाला “तू जितकी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“लग्न आहे आमचं, छान झालयं डेकोरेशन, अमृताचं नाव घेतो, आता लाईफमध्ये नो टेन्शन”,असा उखाणा प्रसाद जवादने अमृता देशमुखसाठी घेतला. दरम्यान त्यांच्या उखाण्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेक कलाकार आणि नेटकरी कौतुक करताना दिसत आहेत.