Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदा शोमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. पाचव्या पर्वात स्पर्धकांकडे बीबी करन्सी असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे दर आठवड्याला दोन्ही गटांमध्ये जास्तीत जास्त करन्सी गोळा करण्यासाठी टास्क खेळवले जातात. याशिवाय गेले चार सीझन महेश मांजरेकरांनी होस्टिंगची सूत्र सांभाळली होती. परंतु, यंदा पहिल्यांदाच रितेश देशमुख हा कार्यक्रम होस्ट करत आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) यंदाच्या सीझनमध्ये खेळ, टास्क, खेळाचे अनेक नियम बदलले गेले आहेत. एकंदर यावर्षी अनेक ट्विस्ट येणार याची माहिती ग्रँड प्रीमियरलाच रितेशने सर्व स्पर्धकांना दिली होती. यानुसार आजच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश आणखी एक धक्का घरातल्या सदस्यांना देणार आहे. ‘बिग बॉस’च्या घरात एक नवीन खोली उघडणार असल्याची घोषणा रितेश करतो.

हेही वाचा : Bigg Boss Marathi- Video : आता वाजले की बारा…; वर्षा अन् जान्हवीचा जबरदस्त डान्स पाहून रितेश देशमुखने मारल्या शिट्ट्या

नव्या खोलीत पहिला सदस्य कोण जाणार?

नव्या खोलीत नेमकं काय असेल? याचा विचार करून सगळेच सदस्य चक्रावून जातात. तसेच रितेशने या खोलीचं नाव काय असेल हे देखील सर्वांना सांगितलं आहे. अभिनेता म्हणतो, “आज तुमच्यासाठी अशी एक खोली उघडेल ज्यामुळे या घरातली सगळी चक्र बदलतील. या रुममध्ये गेल्यावर तुम्ही नक्कीच चक्रावून जाल…कारण, तुम्हाला कळेल कोण आपलं आहे आणि कोण आपल्या विरोधात आहे. या खोलीचं नाव ‘भाऊची चक्रव्यूह रुम’ असं आहे.”

“कोणत्याही गोष्टीचं उद्घाटन करायचं झालं तर पुढारी हवेच” असं सांगत रितेश देशमुख या ‘चक्रव्यूह रुम’मध्ये सर्वप्रथम छोटा पुढारी घन:श्यामला पाठवतो. आता घन:श्यामला आता गेल्यावर काय सांगितलं जाणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : Video : सुशांत सिंह राजपूतनंतर रिया चक्रवर्ती करोडपती निखिल कामथला करतेय डेट, बाईकवरचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले…

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी वाहिनी )

नेटकऱ्यांनी बिग बॉस मराठीच्या या प्रोमोवर कमेंट्स करत “चुगली बूथ असेल”, “आता निक्कीच्या टीमला कळेल”, “आता मजा येणार”, “चुगली बूथ असेल” तर यामुळे B टीममध्ये भांडणं होऊ नयेत अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या प्रोमोवर केल्या आहेत.