Bigg Boss Marathi Seaon 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात आज रितेश देशमुख ‘गणपती विशेष भाऊचा धक्का’ घेणार आहे. रितेश आज कोणाची कानउघडणी करणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलं होतं. अखेर घरात केलेली चुकीची वक्तव्यं, अन्य स्पर्धकांचा अपमान आणि घरात काम करण्यास दिलेला नकार या सगळ्या गोष्टींसाठी रितेशने निक्कीला खडेबोल सुनावले आहेत.

भाऊच्या धक्क्यावर अभिनेत्याने निक्कीला चांगलंच झापलं आहे. “कोणाचा बाप आला तरी मी ऐकणार नाही…ही तुमची दादागिरी मी खपवून घेणार नाही” असं स्पष्ट भाषेत सांगत रितेशने निक्कीला मोठी शिक्षा दिली आहे.

आता संपूर्ण सीझन निक्कीला ‘बिग बॉस मराठी’चा कॅप्टन होता येणार नाही. कॅप्टन्सीच्या शर्यतीतून निक्कीला बाद करण्यात आलं आहे. याशिवाय आणखी एक शिक्षा रितेश निक्कीला देणार आहे. ती शिक्षा कोणती असेल याबाबत आजच्या भागात उलगडा होईल. मात्र, समोर आलेल्या प्रोमोनुसार रितेश देशमुख निक्कीला भाऊच्या धक्क्यावरून उठवणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “इमेज मातीत मिळवली”, अरबाज पटेलवर भडकला रितेश देशमुख; स्पर्धकांना विचारला ‘तो’ प्रश्न अन्… पाहा प्रोमो

निक्कीला भाऊच्या धक्क्यावरून उठण्यास सांगितलं अन्…

रितेश निक्कीला हातवारे करून उठा सांगतो आणि तिला बसण्यासाठी बाजूला एक लहानसा टेबल दिला जातो. यापूर्वी अभिनेत्याने जान्हवीला भाऊच्या धक्क्यावर बसण्यास विरोध केला होता. आता तिच वेळ निक्कीवर येणार आहे.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : निक्कीला भाऊच्या धक्क्यावरून उठवलं ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी वाहिनी )

“निक्की ही आहे तुमची जागा… मी गेल्या आठवड्यात तुमचं कौतुक केलं. कधीपण कौतुक मनात ठेवावं कारण, कौतुक जेव्हा डोक्यात जातं तेव्हा त्याची हवा होते आणि एकदा डोक्यात हवा गेली की, आपला स्वत:वरचा कंट्रोल सुटतो. आपल्यात माज येतो आणि आपणं वाटेल तसं वागतो, वाटेल तसं बोलतो. या आठवड्यात निक्की तुम्ही तेच केलं.” असं सांगत रितेशने तिची चांगलीच कानउघडणी केल्याचं पाहायला मिळत आहे.

एकीकडे निक्कीला झापलं असलं, तरी सूरजच्या खेळाचं आणि तो घराचा नवीन कॅप्टन झाल्याबद्दल रितेशने त्याचं कौतुक केलं आहे. तसेच यापुढे सुद्धा घरात बोलत जा, आपली मतं मांडत जा असा सल्ला रितेशने सूरजला दिला आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “बाप काढायचा नाही…”, भाऊच्या धक्क्यावर निक्कीला मोठी शिक्षा! रितेश संतापून म्हणाला, “इथून पुढे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता कॅप्टन्सी काढून घेण्याबरोबरच रितेश निक्कीला दुसरी शिक्षा काय करणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. अभिनेत्याने निक्कीची कानउघडणी केल्याने सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या भाऊच्या धक्क्याच्या प्रोमोंवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.