‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या शोच्या पहिल्या भागापासूनच चर्चेत असणारी स्पर्धक म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर. अपूर्वाची एक वेगळीच बाजू या शोमध्ये पाहायला मिळत आहे. याआधी विकास सावंतबरोबर कॅप्टन्सी टास्कदरम्यानचा तिने जोरदार भांडण केलं. आता पुन्हा एकदा अपूर्वाचा घरात रुद्रावतार पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Video : किरण माने घरातून बाहेर पडताच विकास सावंत बदलला? अपूर्वा नेमळेकरशी मैत्री अन्…; प्रेक्षकही संतापले

कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये घरातील दोन टीम कॅप्टन्सी पदासाठी खेळताना दिसत आहेत. जी टीम गार्डन एरियामध्ये ठेवलेल्या हत्तीच्या गळ्यामध्ये अधिकाधिक हार घालणार ती टीम जिंकणार असा हा टास्क आहे.

या टास्कमध्ये अपूर्वाने बराच राडा केला असल्याचं दिसत आहे. विरुद्ध टीमबरोबर खेळत असताना अपूर्वा आधी तेजस्विनीला ओढण्याचा तसेच तिला शारिरीक ताकद दाखवत थांबवण्याचा प्रयत्न करते. ती इथवरच थांबत नाही तर प्रसाद जवादेबरोबरही ती तसंच करते.

आणखी वाचा – Video : मान पकडली, टी-शर्ट खेचलं, बराच वेळ अंगावर बसली अन्…; अपूर्वा नेमळेकर व विकास सावंतमध्ये तुफान राडा, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रसाद आपल्या टीमसाठी खेळत असताना “तू आरडाओरडा केल्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही.” असं अपूर्वाला बोलतो. प्रसाद हत्तीला हार घालयला जाणार तितक्यात अपूर्वा त्याच्या अंगावर धावून जाते व त्याच्यावर हात उचलते. तिचा खेळादरम्यान राग अनावर होतो. हा व्हिडीओ पाहून प्रेक्षक अपूर्वालाच ट्रोल करत आहेत. तसेच प्रसादला पाठिंबा देत आहेत. आता अपूर्वा या टास्कदरम्यान आणखी काय राडे करणार हे येत्या भागामध्ये कळेलच.