अभिनेता अक्षय केळकर ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. ‘बिग बॉस मराठी’चं हे सीझन वाद-विवाद, सदस्यांमधील मैत्री अशा बऱ्याच कारणांसाठी चर्चेचा विषय ठरलं. अपूर्वा नेमळेकरपासून ते अगदी विकास सावंतपर्यंत या सगळ्या सदस्यांनी अगदी प्रेक्षकांना वेड लावलं. यामध्ये आणखी एक चेहरा सतत चर्चेत राहिला तो म्हणजे किरण माने. किरण माने यांनीही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

आणखी वाचा – स्वयंपाक करताना जिनिलीया देशमुख तेलाचा वापरच करत नाही, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “तेलाऐवजी मी…”

किरण माने हे ‘बिग बॉस मराठी’मधील टॉप तीन स्पर्धक होते. थोडक्यात ट्रॉफीपासून ते दूर राहिले. पण त्यांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. मुळचे सातारचे असणारे किरण माने त्यांना मिळत असणाऱ्या प्रेमामुळे भारावून गेले आहेत. आता तर चक्क सातारमध्ये त्यांची मिरवणूक निघणार आहे. याबाबत त्यांनी स्वतःच फेसबुक पोस्ट शेअर करत माहिती दिली.

किरण माने यांनी त्यांचा एक पोस्टर शेअर करत म्हटलं की, “काय करू या प्रेमाचं?लै लै लै भारावलोय…सातारला यायला निघालोय भावांनो…प्रवासात थांबेन तिथं लोक “माने माने माने” करत गर्दी करतायत…प्रेमानं बोलतायत…सेल्फी घेतायत…अर्ध्या प्रवासात पोचलोय आणि हे पोस्टर आलं आणि डोळ्यांत पाणी तरळलं! सातारकर प्रेक्षकांनी उत्सफूर्तपणे माझ्या स्वागताची जय्यत तयारी केलीय.”

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 4 : “आज या किरण्याला हरण्याच्या…” किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“बॉम्बे रेस्टारंट ते शिवतीर्था पर्यंत मिरवणूकीचं आयोजन केलंय. भारावून गेलोय. आता एवढंच सांगेन की, हा प्रेमाचा वर्षाव सार्थकी लावेन. कायम तुम्हाला अभिमान वाटेल असंच काम करत राहीन. अजून लै बोलायचंय. उद्यापास्नं पोस्टवर बोलत राहीनच. आत्ता एवढंच सांगेन खूप खूप मनापासून आभार. लब्यू” किरण माने यांच्या चाहतावर्गामध्येही आता बरीच वाढ झाली आहे.