छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो म्हणून ‘बिग बॉस’ला ओळखलं जातं. सध्या हे ‘बिग बॉस’ हिंदीतच नाही तर विविध भाषांमध्ये पाहायला मिळत आहे. दोन महिन्यांपूर्वी ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व पार पडलं. हे पर्व चांगलंच गाजलं. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील स्पर्धक सध्या नेहमी चर्चेत असतात. त्यांचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होतं असतात. अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या चौथा पर्वाचा विजेता लवकरच बोहल्यावर चढणार असल्याचं समोर आलं आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकर ठरला होता. अलीकडेच अक्षयने गर्लफ्रेंड ‘रमा’चा चेहरा सगळ्यांसमोर आणला. ‘बिग बॉस’मध्ये असल्यापासून अनेकदा अक्षयच्या तोंडून रमाविषयी बोलताना ऐकलं आहे. पण अक्षयची रमा कधी, कोणी पाहिली नव्हती. ‘बिग बॉस’मध्ये त्याने अभिनय क्षेत्रातील संघर्षाच्या काळात ‘रमा’ने कशी साथ दिली याबद्दल सांगत “आमची प्रेमकथा फिल्मी” असल्याचं तो म्हणाला होता. तसंच ‘बिग बॉस’मध्ये असताना अक्षयला खास ‘रमा’ने पत्र पाठवलं होतं. यावेळी त्याने पुढच्या एक-दोन वर्षांत ‘रमा’ नक्की कोण आहे? याचा खुलासा होईल असं सांगितलं होतं. रिलेशनशिपला १० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने २२ डिसेंबरला अभिनेत्याने रमाला सगळ्यांसमोर आणलं.

हेही वाचा – शुभमंगल सावधान! ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्याचा मोठ्या थाटामाटात पार पडला लग्नसोहळा, गेल्या नऊ वर्षांपासून होता रिलेशनशिपमध्ये

अक्षय केळकरच्या ‘रमा’चं खरं नाव साधना काकतकर असं आहे. साधनाबरोबर नुकताच अक्षयने पहिला व्लॉग केला. या व्लॉगमध्ये अक्षयने लव्हस्टोरी सांगितली. साधनाला पहिल्यांदा कुठे भेटला?, त्यानंतर काय घडलं?, अक्षय साधनाला ‘रमा’ या नावानेच का हाक मारतो? याबाबत सांगितलं आहे. तसंच यातून एक आनंदाची बातमी दिली आहे. ते म्हणजे अक्षय आणि साधना लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

हेही वाचा – Video: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या सक्सेस पार्टीत महेश कोठारेंचा ‘झपाटलेला’ चित्रपटातील गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Bigg Boss 18: दिग्विजय सिंह राठीनंतर आणखी दोन सदस्य घराबाहेर; कशिश कपूर ढसाढसा रडत म्हणाली, “इथे प्रत्येकजण साप…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अक्षय केळकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने मराठीसह हिंदी मालिकाविश्वात काम केलं आहे. ‘बिग बॉस’ मराठीनंतर अक्षय हिंदी मालिकेत पाहायला मिळाला होता. मग तो ‘कलर्स मराठी’च्या ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसला. त्यानंतर अक्षय ‘कलर्स मराठी’च्याच ‘अबीर गुलाल’ मालिकेत झळकला. या मालिकेत त्याने साकारलेली अगस्त्यची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली.