Bigg Boss Marathi Season 5 Updates : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन केव्हा सुरू होणार याची प्रत्येकाची मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर आतापर्यंत ‘बिग बॉस मराठी’चे ४ सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. परंतु, गेल्या दीड वर्षांपासून प्रेक्षक पाचव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हा बहुचर्चित कार्यक्रम आता येत्या दोन दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘बिग बॉस मराठी’चं यंदाचं पर्व रितेश देशमुख होस्ट करणार आहे. यापूर्वी या कार्यक्रमाचं होस्टिंग ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांनी केलं होतं. परंतु, यंदा ही जबाबदारी तमाम महाराष्ट्राला ‘वेड’ लावणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्यावर सोपवण्यात आली आहे. या शोचा ग्रँड प्रीमिअर २८ जुलै म्हणजे येत्या रविवारी रात्री ९ वाजता करण्यात येणार आहे. यासंदर्भात कलर्स मराठी वाहिनी व जिओ सिनेमाने अधिकृत पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

हेही वाचा : TRPच्या शर्यतीत ‘हे’ ठरले टॉप ५ कार्यक्रम! ‘झी मराठी’ वाहिनीची ‘लाखात एक आमचा दादा’ मालिका आहे ‘या’ स्थानावर, जाणून घ्या…

Bigg Boss Marathiबद्दल उत्सुकता

प्रेक्षक ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन रोज रात्री ९ वाजता कलर्स मराठी वाहिनीवर किंवा जिओ सिनेमा या ओटीटी अ‍ॅपवर पाहू शकतात. ओटीटीवर हा शो पाहायचा असल्यास प्रेक्षकांना प्रतिमहिना २९ रुपये भरावे लागणार आहेत.

मजा, मस्ती, राजा अन् २४ तास ड्रामा सुरु असणाऱ्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यावर्षी काय घडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. ‘बिग बॉस मराठी ५’चा ग्रँड प्रीमिअर रविवारी २८ जुलैला रात्री ९ वाजता ‘कलर्स मराठी’वर होणार आहे. त्यानंतरचे भाग दररोज रात्री ९ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. तसेच जिओ सिनेमा अ‍ॅपवर हे भाग प्रदर्शित होणार आहेत.

हेही वाचा : १३ वर्षांच्या संसारानंतर मोडला सेलिब्रिटी जोडप्याचा प्रेमविवाह, अभिनेत्री एकटीच करतेय मुलीचा सांभाळ; म्हणाली, “माझं लग्न मोडल्यावर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Bigg Boss Marathi
रितेश देशमुख Bigg Boss Marathi

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या आतापर्यंत पार पडलेल्या पर्वांबद्दल सांगायचं झालं तर, पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे, दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे, तिसऱ्या पर्वाचा विजेता विशाल निकम, तर चौथ्या पर्वाच्या विजेतेपदावर अक्षय केळकरने नाव कोरलं होतं. आता या नव्या पाचव्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार याबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.