Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या कालच्या (२९ ऑगस्ट) भागात ‘पाताळ लोक’ टास्क पार पडला. या टास्कच्या वेळी नेहमीप्रमाणे सदस्यांमध्ये वाद पाहायला मिळाले. ‘पाताळ लोक’ टास्कच्या तिसऱ्या फेरीत ‘ए’ टीमकडून निक्की-अभिजीत तर ‘बी’ टीमकडून जान्हवी-सूरज खेळण्यासाठी गेले होते. अभिजीत व जान्हवी पाताळ लोकात जाऊन सोन्याची नाणी शोधणार होते. तर निक्की व सूरज सोन्याची नाणी बॉक्समध्ये जमा करणार होते. परंतु यावेळी अभिजीतच्या पायाला दुखापत झाल्यामुळे ‘बिग बॉस’ने त्याला खेळण्यास मनाई केली. तरी अभिजीतने ऐकलं नाही स्वतःच्या रिस्कवर खेळणार असल्याचं जाहीर केलं.

‘बिग बॉस’ने यावेळी दोन पर्याय दिले. अभिजीतच्या जागी निक्की खेळण्याचा पर्याय दिला. पण निक्कीने अंधाराची भीती वाटत असल्यामुळे नकार दिला. त्यानंतर घरातील इतर एका सदस्याला अभिजीतच्या जागी खेळण्याचा पर्याय दिला. तरीही कोणताच सदस्य अभिजीतच्या जागी खेळण्यासाठी तयार झाला नाही. अखेर अभिजीत हा खेळ खेळला. यावरूनच ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) तिसऱ्या पर्वात झळकलेली अभिनेत्री सोनाली पाटील भडकली. तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर आपलं मत मांडलं.

हेही वाचा – Video: “संचालक चुकीचे…”, धनंजय पोवारच्या आई व पत्नीच्या संतप्त भावना, म्हणाल्या, “जीव तोडून २७ नाणी गोळा केली…”

Bigg Boss Marathi Season 5 (Photo Credit – Jio Cinema)

सोनाली पाटील नेमकं काय म्हणाली?

सोनाली पाटील म्हणाली, “मला हे म्हणायचं आहे, जर तुम्ही टास्क खेळतायत, अभिजीतच्या दादाच्या पायाला दुखापत आहे हे दहा वेळा बिग बॉस ( Bigg Boss Marathi ) सांगतंय. तसंच बिग बॉस ही देखील परवानगी देतायत की, त्याच्या बदल्यात निक्की खेळू शकते. पण निक्कीला खेळायचं नाहीये. कारण तिला अंधाराची भीती वाटते. ठीक आहे. तर बसलेल्या लोकांपैकी कोणीही अभिजीत दादाला मदत करू शकतं, ही बिग बॉसने परवानगी देऊन सुद्धा कोणाचं धाडस होतं नाही.”

“ठिक आहे अभिजीत दादा, निक्की जशी कशी आहे ना आम्ही तिचा तिरस्कार करतो. पण आम्हाला तुझ्याबद्दल जास्त प्रेम आहे. या एका गोष्टीसाठी आम्ही तुझ्यासाठी खेळतो. कारण तुला त्या गुडघ्यावर चालायचं आहे, जे तुझ्यासाठी फार धोकादायक आहे. पुन्हा जर जखम झाली तर आयुष्यात पुढे जाण्यासाठी धोकादायक आहे. तुमचं अभिजीत दादावर खरंच प्रेम आहे, तर तुम्ही निक्कीच्या मागे का लागला आहात? म्हणजे तुम्हाला निक्कीला नमावायचं आहे की अभिजीत दादावरचं प्रेम दाखवायचं आहे. जर अभिजीत दादावरच प्रेम दाखवायचं असतं तर तुम्ही स्वतःहून पुढे गेला असता. ना निक्कीच्या पाठी लागला असता. तुम्हाला निक्कीला नमवायचं आहे. तुम्हाला ती गोष्ट अभिजीत दादाच्या दुखापतीपेक्षा मोठी वाटते. त्याला पुन्हा इजा झाली तरी चालेल. शेवटपर्यंत कोणी सुद्धा पुढे गेलं नाही. मला असं वाटतं, ‘बिग बॉस’ घरात या पर्वात कोणीही माणुसकी दाखवलेली नाही. जर दाखवली असेल तर तो फक्त अभिजीत दादा,” असं आपलं स्पष्ट मत सोनालीने मांडलं.

हेही वाचा – “तोच माज, बॉडी लँग्वेज तशीच…”, जान्हवीला जेलमध्ये पाठवून काय फरक पडला? सुरेखा कुडची यांचा सवाल, म्हणाल्या…

View this post on Instagram

A post shared by Sonali Patil (@sonale_paatil42)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनाली पाटीलच्या या व्हिडीओवर ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडेसह अनेकांनी प्रतिक्रिया केल्या आहेत. सोनालीने अगदी बरोबर मुद्दा मांडल्यांचं नेटकरी म्हणत आहेत. मेघा धाडे म्हणाली की, तू योग्य मुद्दा मांडलास. आपण तिथे असतो तर नक्कीच हे केलं असतं. पण माझ्या मते, त्यांना दाखवून द्यायचं होतं की निक्की काय प्रकार आहे. असं असू शकतं.