Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचव्या पर्वाचा अंतिम आठवडा सुरू आहे. अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगांवकर हे सदस्य अंतिम आठवड्यापर्यंत पोहोचले आहेl. यापैकी निक्की तांबोळी ही फायनलिस्ट झाली आहे.

सोमवारी ( ३० सप्टेंबर ) तिकीट टू फिनालेचा टास्क झाला. यावेळी निक्कीने म्युच्युअल फंडमधील कॉइन दावाला लावून थेट अंतिम फेरीत सहभाग घेतला. त्यानंतर उर्वरित सहा सदस्यांमध्ये बाबागाडीचा खेळ खेळला गेला. यात सदस्यांना घरात ठेवलेले झेंडे जमा करायचे होते. कमी वेळेत सर्वाधिक झेंडे जमा करून सूरज हा तिकीट टू फिनालेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचला. त्यानंतर सूरज विरुद्ध निक्की असा अंतिम फेरीचा टास्क रंगला. यावेळी निक्कीने बाजी मारली आणि तिने तिकीट टू फिनाले जिंकला. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील पहिली फायनलिस्ट निक्की ठरली. अशातच सध्या कलाकार मंडळी आपापल्या आवडत्या सदस्याला मत देण्यासाठी प्रेक्षकांना आवाहन करत आहेत. अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या नेमकं काय म्हणाल्या? जाणून घ्या…

हेही वाचा – Video: “याला स्वतःच्या हिंमतीवर पुढे जायचं नाहीये”, अंकिताने अभिजीतला लगावला टोला, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

अभिनेत्री सुरेखा कुडची म्हणाल्या, “हॅलो नमस्कार, आपला पॅडी नेमका या आठवड्यात बाहेर पडलाय आणि आता अंतिम आठवडा चालू आहे. माझी मनापासून इच्छा आहे की, ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची ट्रॉफी सूरज चव्हाणने जिंकावी. सूरज जर का तू बाहेर ट्रॉफी घेऊन आलास तर मला मनापासून आनंद होईलच. पण अख्खा महाराष्ट्र याची वाट बघतोय की तू ट्रॉफी घेऊन केव्हा बाहेर येतोस. तुझ्याकडून खूप आशा आहेत. तू ट्रॉफी जिंकून बाहेर यावं, अशी मला मनापासून इच्छा आहे. बाकी आवडणारे सदस्य म्हणालं, तर अंकिता सुद्धा आहे, वर्षाताई सुद्धा आहे आणि अभिजीत सुद्धा आहे. राहिला प्रश्न निक्कीचा, तर निक्कीला फिनालेच पहिलं तिकिट मिळालंय. त्यामुळे तू तिकीट घेऊन खूश राहा. आम्ही ट्रॉफीपर्यंत जाऊ देणार नाही.”

हेही वाचा – Video: …म्हणून निक्कीला आला अंकिताचा राग, जान्हवीला म्हणाली, “ही एक नंबरची कुचकी पोरगी आहे”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तिकीट टू फिनालेचा टास्क झाल्यानंतर ‘बिग बॉस’ने एक घोषणा केली ती म्हणजे मीड डे एविक्शनची. त्यामुळे आता येत्या दिवसांत अभिजीत, धनंजय, जान्हवी, सूरज, अंकिता आणि वर्षा उसगांवकरांपैकी कोणत्या सदस्याची अंतिम फेरीपर्यंत जाण्याची संधी हुकते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.