Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा चौथा आठवडा सुरू आहे. गेले तीन आठवडे स्पर्धकांनी चांगलेच गाजवले. गेल्या आठवड्यात डबल एविक्शन झालं. निखिल दामले व योगिता चव्हाण हे दोन स्पर्धक ‘बिग बॉस’च्या घराबाहेर गेले. त्यामुळे सध्या निखिल, योगिता विविध माध्यमांशी संवाद साधताना दिसत आहे. याच वेळी योगिताने सुरज चव्हाणचं भरभरून कौतुक केल्याचं पाहायला मिळालं.

‘बिग बॉस मराठी’ ( Bigg Boss Marathi ) सुरू झाल्यापासून सुरज चव्हाण खूप चर्चेत आहे. मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींसह अनेकांचा पाठिंबा सुरज चव्हाणला मिळताना दिसत आहे. सुरज चव्हाणने आपल्या साधेपणाने आणि खेळाने अख्खा महाराष्ट्राचं मनं जिकलं आहे. त्यामुळे आतापासूनचं अनेक जण सुरज चव्हाणचं ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता होणार असं म्हणताना दिसत आहेत. अशातच घराबाहेर झालेल्या योगिता चव्हाणने देखील एका मुलाखतीमधून सुरज चव्हाणवर स्तुती सुमने उधळली.

हेही वाचा – “बलात्कारासारख्या घृणास्पद कृत्याचं राजकारण…”, बदलापूर प्रकरणावर तेजस्विनी पंडितची संतप्त पोस्ट; सोनाली म्हणाली, “पुरे झालं आता…”

योगिता चव्हाण सुरजबद्दल नेमकं काय म्हणाली? वाचा

‘मराठी वर्ल्ड’ या युट्यूब चॅनलशी संवाद साधताना योगिता चव्हाण म्हणाली, “सुरज चव्हाणबद्दल काय बोलू. संपूर्ण महाराष्ट्राबरोबर मीही त्याच्या प्रेमात आहे. तोही माझ्या भावासारखाच आहे. माझ्या सख्ख्या भावाचं नाव सुरज चव्हाण आहे. तो खूप गोड मुलगा आहे. खूप साधा मुलगा आहे. तो मला बिग बॉसच्या ( Bigg Boss Marathi ) घरात चिऊताई बोलायचा आणि माझं घरचं नाव चिऊ असल्यामुळे मला ती घरची हाक वाटायची. तो मनापासून खूप चांगला आहे. खूप चांगला टास्क खेळतो. निपक्ष खेळतो. कधीच त्याला चिडता येत नाही. त्याला चिडण्याची कन्सेप्ट माहित नाहीये. त्यामुळे जे खरं आहे ते प्रेक्षकांना दिसतंय. उगाच लोक त्याच्या प्रेमात नाहीये…खरंच तो खूप चांगला आहे. घरातली माणसं त्याच्या प्रेमात आहेत, घराबाहेर अख्खा महाराष्ट्र त्याचा प्रेमात आहे.”

हेही वाचा – “रितेश भाऊ जरा आवाज वाढवा…”, जान्हवीने पंढरीनाथ कांबळेचा अपमान केल्यामुळे भडकल्या सुरेखा कुडची, म्हणाल्या, “मांजरेकर असते तर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) चौथ्या आठवड्यात ‘सत्याचा पंचनामा’ हा पहिला टास्क खेळला गेला. या टास्कच्या माध्यमातून बीबी करन्सी जिंकण्याची संधी ‘ए’ टीम आणि ‘बी’ टीमकडे होती. पण दोन्ही टीम या टास्कमध्ये अपयशी ठरल्या. त्यामुळे आता दोन्ही टीममधील स्पर्धकांना हरल्यामुळे येत्या भागात काहीतरी गमवावं लागणार आहे.